Ticker

6/recent/ticker-posts

नोंदणीकृत अ‍ॅक्युपंक्चर व्यवसायीकांना प्राथमिक उपचार प्रशिक्षणाची गरजअ‍ॅक्युपंक्चर प्रॅक्टीशनर असोसिएशनची काऊंन्सिलकडे मागणी


वाशिम - महाराष्ट्र काऊंन्सिल ऑफ अ‍ॅक्युपंक्चर, मुंबई येथे नोंदणीकृत असलेल्या बी ग्रुपमधील सर्व अ‍ॅक्युपंक्चर व्यवसायीकांना प्राथमिक उपचाराची प्रशिक्षण देण्याची गरज असून त्यासाठी काऊंन्सिलने पुढाकार घ्यावा अशी मागणी अ‍ॅक्युपंक्चर प्रॅक्टीशनर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारी रोजी काऊंन्सिलचे प्रबंधक नारायण नवले यांना मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेवून मागणीचे निवेदन दिले.
    निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र काऊंन्सिल ऑफ अ‍ॅक्युपंक्चर मधील बी ग्रुप मध्ये नोंदणीकृत असलेल्या व्यावसायीकांना काऊंन्सिल मार्फत प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण देण्याचे प्रयोजन करावे. उपचार करत असतांना
जर एखाद्या रुग्णाला काही त्रास जाणवल्यास त्यांना योग्य तो प्राथमिक उपचार आपल्या व्यवसायीकांना करणे गरजेचे असून आपण काऊंन्सिल मार्फत बी ग्रुप च्या सर्व सदस्यांना प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण देवून प्रशिक्षीत करावे अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी असोसिएशनच्या मागणीवर आपण सकारात्मक असून या मागणीवर आपण लवकरच योग्य निर्णय घेवू असे यावेळी प्रबंधक नारायण नवले यांनी म्हटले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांच्या वतीने नारायण नवले यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments