अमरावती / अचलपूर लोणी, २ मार्च: अमरावती शहर व जिल्ह्यात गेल्या २४ तासात तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील बिस्मिल्ला नगर भागातील एका तुटलेल्या घरात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला असून,
जिल्ह्यातील शेकापूर जवडी या गावी शेतकऱ्याची हत्या अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तर लोणी येथे एका मित्राने आपल्या मित्राला
केले.धीरजच्यापोटावरवगळ्यावर खोलवर घाव होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्रावझाला आणित्यातचत्याचा मृत्यूझाला, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याघटनेनंतर लोणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान पोलिसांनी बळीराम चंदुलाल पवार याला अटक करुन त्याच्या विरुध्द भादंवि ३०२ कलमान्वये व अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. बिस्मील्ला नगरात रक्तबंबाळमृतदेह
अमरावती शहरातील बिस्मील्लानगर परिसरातील अ हारुण नामक व्यक्तीच्या घराचे काम सुरु होते. घराच्या भिंती आणि छतही पाडून टाकण्यात आले होते. या घरात एक मृतदेह दिसल्याची माहिती एका दुधवाल्याने आज गुरवारी नागपुरी गेट पोलिसांना दिली. यानंतर पोलिसउपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त पुनम पाटील, ठाणेदार पुंडलीक मेश्राम, एपीआय हिवाले, आदी घटनास्थळी पोहचले. या ठिकाणे एका पोत्यात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. चौकशीअंती मृत व्यक्ती लालखडी भागात राहणारा रमजान खान रहमान खान (५७) हा असल्याची निष्पन्न झाले. तो कटला चालवण्याचे काम करत असून, याप्रकरणी नागपूरी गेट पोलिसांनी मर्ग दाखल केला करुन पुढील तपास सुरु केला आहे.
शेकापूर जवर्डीत शेतकऱ्याची हत्या
चाकूने वार करुन संपवल्याची घटना घडली आहे.
लोणीत मित्रानेच केली मित्राची हत्या लोणी परिसरातील एका हिस्टरी टीचर ची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याच्या मित्रानेच त्याचा खून केल्याचे वृत्त असून, पोलिसांनी बळीराम चंदुलाल पवार (वय २५) याला याप्रकरणी अटक केली आहे.
जिल्ह्यातील लोणी येथे धिरज मुरलीधर गायगोले (२५ रा लोणी) याची चाकूने वार करुन हत्या करण्यात आल्याचे गुरूवारी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास उघडकीस आले. धिरज हा हिस्टीशीटर असून, या घटनेनंतर पोलिसांनी त्याचा मित्र बळीराम चंदुलाल पवार (वय २५) याच्याविरुध्दा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. धीरज
मुरलीधर गायबोले व बळीराम चंदुलाल पवार हे एकाच गावातील रहिवासी असून, लहानपणापासूनचे मित्र होते. दरम्यान स्वभाव न आवडल्याने व वर्तणुकीत बदल झाला म्हणून त्याने सहा महिन्यापूर्वी अचानक मैत्री तोडली. बळीरामशी बोलणे बंद केले; त्याने असे का केले, केवळ या कारणास्तव बळीरामने धीरज याची चाकूने वार करून हत्या केली. दोघेही गुरुवारी सकाळी ते वेगवेगळ्या कामाने गावातील चौकात आले. याठिकाणी महाजन यांच्या दुकानासमोरच बळीरामने धीरजच्या शरीरावर चाकूने सपासप वार करुन त्याला ठार केले. या घटनेनंतर नागरिकांची धावाधाव झाली. धीरजला लगेच दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अचलपूर तालुक्यातील शेकापूर जवर्डी या गावात लक्ष्मणगायकवाडया५५ वर्षीयशेतकऱ्याची अज्ञात व्यक्तीने भर दिवसा घरात घुसून हत्या केल्याची खळबळनक घटना घडली आहे. लक्ष्मण गायकवाड आपल्या २२ वर्षीय विशाल या मुलासोबत राहत होते. तो शेतातून दुपारच्या वेळी परत आला असता, त्याला घरात वडील लक्ष्मण गायकवाड रक्तबंबाळ अवस्थेत मृतावस्थेत पडल्याचे दिसले. त्याने त्वरीत पोलिस पाटील यांच्या माध्यमातून परतवाडा पोलिसांना माहिती दिली. परतवाडा येथील ठाणेदार संदीप चौहान आपल्या पथकासह तेथे पोहचले. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.
0 Comments