Ticker

6/recent/ticker-posts

यशवंतरावजी चव्हाण यांना अभिवादन

                  
वाशिम,दि.१२ 
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे पाचवे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज १२ मार्च २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले .               देशाच्या राजकारणावर ज्यांचा प्रभाव होता असे ते राजकारणी होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यासोबतच सामाजिक कार्य आणि साधी राहाणी हे त्यांचे वैशिष्टय होते. भारताच्या उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले असले तरी सामान्य माणसाशी त्यांची नाळ जोडलेली होती. 
            यावेळी नायब तहसीलदार माधव शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.प्रसंगी नाझर आनंद आरू,सुवर्णा सुर्वे,शितल पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments