Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी कृती करण्याची गरज...... गजानन हरणे.

 
अकोला....
 आज देशाला युवा क्रांतीच वाचवू शकते त्यासाठी युवकांनी विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी कृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केळीवेळी येथे सरस्वती कला महाविद्यालय दहीहंडा च्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ समाजसेवक तथा निर्भय बनो जनआंदोलनाचे संयोजक गजानन हरणे यांनी मार्गदर्शन करताना  केले.                         
 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. गणेश पोटे, गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जण आंदोलन, सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश आढे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हर अर्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक डॉ. प्रा. गणेश पोटे यांनी केले. तर या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराला प्रमुख वक्ते म्हणून समाजसेवक गजानन हरणे यांनी मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले . मतदार जनजागृती केली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. तसेच प्रमुख उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन कु. तृप्ती शिरसाट तर आभार कु.पल्लवी देवगडे यांनी केले. या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराला शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवक समिती, आर्ट ऑफ लीव्हिंग परिवार, हनुमान मंडळ , ग्राम मंडळ केळीवेळी, महाविद्यालयाचे प्राध्यापक वूद शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली कार्यक्रम शांततेत परंतु उत्साही वातावरणात पार पडला.  
............... ....................

Post a Comment

0 Comments