Ticker

6/recent/ticker-posts

०३ वर्षांपासून प्रलंबित अपहरणाच्या गुन्ह्यातील ०२ अपहृत बालिका व आरोपींचा शोध घेण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षास यश.

वाशिम जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतील पळवून नेलेल्या मुलींचा शोध व तपासावर दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा तपास करून सदर मुलींचा शोध घेण्यासाठी सदरचे प्रकरणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वाशिम यांच्याकडे वर्ग केले जातात. अश्या गुन्ह्यातील पिडीत मुलींचा शोध घेण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वाशिम अहोरात्र मेहनत घेत आहे.
      त्या पार्श्वभूमीवर दीर्घ काळापासून अपहृत व पळवून नेलेल्या मुलींचा शोध लावण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षास यश आले असून त्यामध्ये मागील ०३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ०२ अपहरणाच्या गुन्ह्यातील अपहृत बालिका व आरोपींचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षास यश प्राप्त झाले आहे. गतवर्षीसुद्धा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वाशिम यांनी उत्कृष्ट तपास करत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले १२ गुन्हे उघडकीस आणले होते.
     पो.स्टे.कारंजा ग्रामीण येथील अप.क्र.४८८/२०, कलम ३६३ भादंवि मधील ३ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस कर्जत जिल्हा.रायगड येथून ताब्यात घेत पिडीतेची सुटका करून तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पो.स्टे.मंगरूळपीर येथील अप.क्र.८६५/२०, कलम ३६३ भादंवि मधील आरोपीस तळोजा कॅम्प, मुंबई येथून ताब्यात घेत पिडीतेची सुटका करून तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. २०२० पासून तपासावर प्रलंबित असलेले दोन्ही गुन्हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वाशिम पथकाने उघडकीस आणले असून आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
     सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा श्री.जगदीश पांडे यांचे मार्गदर्शनाखाली मपोउपनि.स्वाती इथापे, मपोहवा.रजनी सरकटे, पोहवा.संदीप निखाडे, मपोशि.उज्ज्वला गायकवाड, मपोशि.रेखा कांबळे यांनी पार पाडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
 

       

Post a Comment

0 Comments