या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी. एम ई सि बी चे शासकीय कॉन्ट्रॅक्टदार,
संजय मिसाठ , राष्ट्रवादीच्या वाशिम जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष ज्योतीताई ठाकरे, ब्रह्माकुमारी सारिका दीदी, बीके
दादी हृदयमोहिनी यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त पुष्प अर्पण करून
संजय मिसाळ व ज्योती ठाकरे इत्यादींनी पुण्यतिथीनिमित्त दादींना अभिवादन केले!
ब्रह्माकुमारी सारिका दीदी, बीके यांनी दादीच्या जीवनाबद्दल माहिती सांगितली राजयोगिनी दादी हृदयमोहिनी यांचे 11 मार्च 2021 रोजी निधन झाले होते. दादीला सर्वजण प्रेमाने गुलजार दादी म्हणत होते. दादींना दिव्य दृष्टी लाभली. ब्रह्माबाबा अव्यक्त झाल्यानंतर 50 वर्षे त्यांनी ब्रह्मवत्सासाठी दैवी दूताची भूमिका बजावली. अध्यात्मिक जीवनात, योग-तपश्चर्येच्या खोलात कसे जायचे आणि राजयोगाचा सखोल अनुभव जीवनात कसा समाविष्ट करायचा, इत्यादींचे लोकांना मोलाचे मार्गदर्शन लाभत आले. यामुळेच लाखो ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारी तुमच्या जीवनातून प्रेरणा घेतात आणि ती आपल्या जीवनात आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात.
दादी हृदयमोहिनी यांचे बालपणीचे नाव शोभा दीदी होते. यांचा जन्म 1928 साली कराचीमध्ये झाला. दादी ८ वर्षांचे असताना, संस्थेचे खरे संस्थापक ब्रह्माबाबा यांनी उघडलेल्या ओम निवास बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. इयत्ता चौथीपर्यंत इथेच शिक्षण घेतले. शाळेतील बाबा आणि मम्मा यांच्या आपुलकीने, प्रेमाने ्प्रभावित होऊन त्यांनी आपले जीवन त्यांच्यासारखे घडवण्याचा निर्णय घेतला. दादी हृदयमोहिनी यांनी चौथीपर्यंतच शिक्षण घेतले. कुशाग्र बुद्धीमुळे जेव्हा जेव्हा ध्यानाला बसत होत्या त्यांना सुरुवातीपासूनच दैवी परमात्म्याचा अनुभव येऊ लागले. ध्यानादरम्यान त्यांना काही वेळा दैवी आत्म्याचे दर्शनही झाले , ज्याचा त्यांनी ध्यानानंतर ब्रह्मा बाबा आणि त्यांच्या सहकारी बहिणींनाही उल्लेख केला होता.
निजानंद स्वरूपम शिवोहम शिवोहम...
ज्ञान स्वरूपम शिवोहम शिवोहम...
आनंद स्वरूपम शिवोहम शिवोहम...
प्रकाश स्वरूप शिवोहम शिवोहम...
दररोज 20 लाखांहून अधिक लोक आध्यात्मिक नियमांचे पालन करुन या मार्गावर सतत पुढे जात आहेत. त्याद्वारे ईश्वराच्या आगमनाची माहिती घेऊन आणि त्यांच्याकडुन शक्ती घेऊन मानवी आत्म्यांचे जीवन चांगले बनविण्यासाठी सेवा अविरत सुरु आहे. संस्थेशी निगडित नियमित विद्यार्थी ईश्वराचे महान वचन ऐकून, मनन आणि चिंतन करुन आपले जीवन घडवण्यात व्यस्त असतात. तसेच, राजयोगाद्वारे ते परमात्म्याशी थेट संवाद साधत असतात. राजयोग आणि अध्यात्मिक शिक्षणाच्या माध्यमातून मनुष्य नरापासुन नारायण आणि नारी पासुन लक्ष्मी बनण्याचे उच्च कार्य करत आहे.
ब्रह्मकुमारी एक अद्भुत आणि अद्वितीय विद्यालय आहे जिथे नवीन सृष्टीची ' पटकथा ' लिहिली जात आहे. असे विचार सारिका दीदी यांनी व्यक्त केले
ब्रह्माकुमारी सारिका दीदी बीके , गौरी दीदी, नीता दीदी , बबिता दीदी, संजय सारडा, डॉक्टर सुगत चव्हाण, नरेंद्र लोहिया, पुरुषोत्तम देशमुख, जयपाल राठोड, देवलाल इंगोले, जगदीश नाचणे, प्रतापसिंह ठाकुर, टिळक राठोड, प्रशांत कोरडे, हिम्मतराव बारड, सुरेश घोडे, विजय राठोड, मंगरूळपीर सेंटरवर येणाऱ्या ब्रह्मकुमार व ब्रह्मकुमारी
शहरातील महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती वृत्तसंकलन करण्याकरता, वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी, पत्रकार गोपाल माचलकर
0 Comments