Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता" ; बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. यावर जंयत पाटील म्हणाले, मराठवाड्यात महाविकास आघाडी एकत्र जमणार आहे. सर्व विभागात आम्ही सभा होणार आहे. 
जयंत पाटील म्हणाले, सुप्रमी कोर्टाच्या निकालामध्ये शिंदे गटातील आमदार जर अपात्र झाले तर शिदें-फडणवीस सरकारला सत्तेत राहता येणार नाही. त्यामुळे राज्यात राजवट लागणार आहे. राष्ट्रपती राजवटीबाबत जयंत पाटील योग्य बोलत आहेत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. सर्वकाही कायद्याने होत असेल तर १६ आमदार अपात्र ठरतील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदेसह आमदार अपात्र ठरले तर सरकार कोसळेल, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली राजकीय खलबते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संपुष्टात येऊ शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या विरोधात दाखल याचिकेवर न्यायालय निकाल देणार आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे.ते १६ आमदार कोण?एकनाथ शिंदे, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, यामिनी जाधव, अनिल बाबर, बालाजी किणीकर, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, महेश शिंदे, लता सोनवणे, चिमणराव पाटील, रमेश बोरनारे, संजय कलिंगड, संजय राऊत, या आमदारांच्या अपात्रतेची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments