वाशिम, दि. 06 : सर्वसामान्य व मध्यमवर्गीय जनतेला माफक व स्वस्त किंमतीमध्ये औषधी प्राप्त व्हावीत,म्हणून प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना ही केंद्र शासनाच्या वतीने योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत संपूर्ण देशात जवळपास 9 हजार औषधी दुकान सुरु करण्यात आले आहे. या दुकानामध्ये उपलब्ध असलेली सर्व औषधी ही ब्रँडेड औषधीपेक्षा जवळपास 50 टक्के ते 90 टक्के इतक्या स्वस्त दरात औषधी उपलब्ध आहे. ज्या औषधी डब्ल्यूएचओ जीएमपी उत्पादकांना प्रमाणपत्र मंजूर आहे,त्याच उत्पादकांकडून ही औषधी बनवूण घेण्यात येतात. त्यामुळे ही औषधी उच्च दर्जाची असतात. सन 2014 मध्ये संपूर्ण भारतात फक्त 80 जन औषधी केंद्र होते. आज जवळपास 9 हजार केंद्र आहेत आणि 31 डिसेंबर 2023 पर्यंत 10 हजारचा टप्पा गाठण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
महिलांचा आरोग्य सुरक्षेची दखल घेऊन भारत सरकारने जन औषधी सुविधा सॅनिटरी पॅड सर्व जन औषधी केंद्रामध्ये माफक दरात उपलब्ध करुन दिले आहे. जन औषधी केंद्रावर जन औषधी सुविधा सॅनिटरी पॅड 1 रुपये प्रति पॅड या दरामध्ये उपलब्ध आहे. सर्व सामान्य जनतेने प्रधानमंत्री जन औषधी केंद्रातून जास्तीत जास्त औषधी घेण्याबद्दल जनजागृती करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. आपण ग्राहक म्हणून जन औषधांची मागणी करावी. जन औषधी दिनाचे औचित्य साधून जनतेने जास्तीत जास्त औषधी हे प्रधानमंत्री जन औषधी केंद्रातूनच खरेदी करुन औषधी खर्चात बचत करावी. असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
*******
0 Comments