मंगरूळपीर :- स्थानिक श्री.वसंतराव नाईक कला व श्री.अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरूळपीर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.प्रमोद तायडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ.प्रमोद येवले आणि डॉ.राजेश बुरंगे संचालक राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी चमू व्यवस्थापक म्हणून निवड केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाच्या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रेरणा- 2023 हे राज्यस्तरीय पाच दिवसीय नेतृत्व गुण विकास शिबिर हे दि.13 ते 17 मार्च 2023 यादरम्यान आयोजित केले. या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील एकूण 17 विद्यापीठांनी सहभाग घेतला. प्रा. प्रमोद तायडे यांनी गेल्या पाच वर्षापासून रासेयो कार्यक्रम अधिकारी म्हणून मंगरूळपीर विभागात सामाजिक बांधिलकी जपत समाज परिवर्तनासाठी शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, सामाजिक व कोरोना काळात केलेल्या समाज उपयोगी व समाजसेवेची दखल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेऊन त्यांना 2019 - 20 मध्ये जिल्हास्तरीय स्वच्छ भारत स्वस्थ -भारत अभियान पुरस्कार देऊन गौरवांकित केले आहे. तसेच या आधी त्यांनी कर्नाटक मधील मेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेतही चमू व्यवस्थापक म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वात अनेक समाज उपयोगी प्रकल्प निर्माण झाले आहेत. बहुविध कार्याची दखल घेऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने त्यांची प्रेरणा 2023 राज्यस्तरीय नेतृत्व गुणविकास शिबिराकरिता चमू व्यवस्थापक म्हणून निवड केली. आणि विद्यापीठाने करण धनंजय शेजव, कु.संध्या सुरेश गवळी श्री.वसंतराव वसंतराव नाईक महाविद्यालय मंगरूळपीर जि.वाशिम, यांची निवड केली. या शिबीरा अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धेमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चमुने सहभाग घेऊन सोलोगित या स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने कु. ऋतुजा पद्माकर कळसकर हिला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू व प्र-कुलगुरू यांनी सन्मानित केले. आणि लोकनृत्य या स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने कु.वंशिका श्रीसाम हिला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर राष्ट्रीय एकात्मता व वसुधैव कुटुम्बकम या मुक नाट्याची प्रशंशा करण्यात आली. अशा विविध कला प्रकारात या शिबिरामध्येही त्यांच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूने बाजी मारली. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉ.प्रमोद येवले व डॉ. राजेश बुरंगे संचालक राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी संघ व्यवस्थापक प्रा.प्रमोद तायडे व सर्व चमुचे अभिनंदन केले. या त्यांच्या झालेल्या निवडीबद्दल व केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अ.राठोड साहेब, संस्थेचे सचिव मा.डॉ.अश्विन कुमार नाईक, कोषाध्यक्ष श्री.पी.पी.इंगोले, व्यवस्थापन कार्यकारी अधिकारी डॉ. एल.के.करांगळे व महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.एस.ए.राठोड, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments