वाशिम : वाशिम तालुक्यातील एका गावातील विवाहितेवर एकटी असल्याचा फायदा घेऊन अतिप्रसंग करीत नग्नावस्थेतील छायाचित्रे काढून मागील दोन वर्षांपासून बलात्कार करणाऱ्याविरुद्ध हिंगोली (ता. जि. हिंगोली) ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे .पीडित महिला हिंगोली तालुक्यातील एका गावात सध्या वास्तव्यास आहे. मात्र ती मूळची वाशिम तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. मूळ गावात ती कपडे धुण्यासाठी गेली असता, पाठीमागून येत अमोल गोवर्धन जाधव याने मी तुझ्या लग्नात आलो होतो, तू मला तेव्हापासूनच आवडते म्हणून तिचा विनयभंग केला. त्यानंतर ती तिच्या घरी असताना एकटी असल्याचे पाहून तिच्यावर जबरी अतिप्रसंग केला. एवढेच नव्हे, तर मोबाईलमध्ये नग्नावस्थेतील फोटो काढले. ते दुसऱ्याला दाखविण्याची धमकी देत पुन्हा वारंवार तिच्यावर अतिप्रसंग करीत होता. १२ फेब्रुवारी २०२३ च्या रात्री १२ वाजताही गावातील तिच्या घरात हा प्रकार घडला. याबाबत तिने ३ मार्च रोजी रात्री आठच्यासुमारास हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाशिम पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments