मंगरूळपीर तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रा.सुधीर घोडचर आपले विचार व्यक्त करताना 15 मार्च 1962 साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकन संसदेपुढे केलेल्या भाषणात तेथील ग्राहकांना सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा, निवडीचा आणि प्रतिनिधित्व चार हक्क प्रदान केले. त्यानंतरच्या कालावधीत ग्राहक संस्थांच्या जागतिक संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाशी चर्चा आणि पाठपुरावा करून मुलभूत गरज पुरविण्याचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क या आणखी चार ग्राहक हक्कांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.
वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख नीटनेटकी करून घ्यावी. वस्तूची ऑनलाईन खरेदी करताना सुद्धा ग्राहकांनी सावधगिरी बाळगायला हवी. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांसाठी हा दिन साजरा होणे गरजेचे आहे. ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे 1960 मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहकांच्या प्रश्नांचा निचरा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले आणि त्यासाठीचे जागतिक स्तरांवर पाठपुरावेही करण्यात आले. त्याला यूनेस्कोनेही मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना काळजी घेण्यासारख्या काही महत्वाच्या गोष्टी :
- फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.
- वस्तू खरेदी करताना एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत देऊ नका.
- वस्तू खरेदी करताना बिल मागावे.
- सोने खरेदी करताना हॉलमार्ककडे लक्ष द्या.
- डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा.
- वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासून पहा
जीवाश्म इंधनासारख्या पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, आणि शाश्वतता, सुरक्षितता, किफायतशीरपणा, आणि ग्राहकांसाठी दीर्घ काळ उपलब्धतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्वच्छ ऊर्जा उपायांकडे जलद संक्रमण करता यावे, यासाठीच्या संकल्पनेला अनुसरून, तंत्रज्ञानाच्या वापरावर प्राथमिक भर दिला जाणार आहे.
एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व इत्यंभूत माहिती मिळवणे हा ग्राहकांचा हक्क आहे. संबंधित उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे. हा हक्क कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक नाकारू शकत नाही. किंबहूना सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासून घेण्याचा अधिकार आहे.
वस्तूंची खरेदी करताना आपल्याला हवी असलेलीच वस्तू निवडून घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. कारण आज अटीतटीच्या स्पर्धेच्या युगात ग्राहकाला एकाच वस्तूचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे त्याच्या निवडीलाही स्वातंत्र्य आहेच, पण एखाद्या विक्रेत्याने संबंधित ब्रँड्सच्याच वस्तू खरेदीचा दबाव टाकल्यास हे ग्राहकांच्या हक्काचे उल्लंघन आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या हाॅटेलात गेलात. तिथे तुम्ही कोल्ड ड्रींकची आॅर्डर केली. वेटरने तुम्हाला सांगितलं की एकाच प्रकारचे कोल्ड ड्रींक येथे मिळेल तर हे ग्राहकांच्या हक्काविरोधात आहे, कारण अनेक पर्यायातून एक पर्याय निवडीचा अधिकार ग्राहकांना आहे.
ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तूंच्या सुरक्षिततेची हमी उत्पादकांनी घेणे बंधनकारक आहे. वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेबाबत तसेच त्या वस्तूवर मिळणाऱ्या सेवांबाबत आग्रही राहण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे. ग्राहकांनी शक्यतो आयएसआय आणि अॅगमार्कचं चिन्ह असलेल्या वस्तूच विकत घ्याव्यात.
मत मांडण्याचा हक्क - एखाद्या ठिकाणी तुमची फसवणूक झाली असे वाटत असेल तर त्यासंदर्भात तक्रार निवारण मंच आणि ग्राहक हक्क न्यायालयात दाद मागण्याचा हक्क सरकारने ग्राहकांना दिला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतो.
ग्राहकांचे हक्क जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. त्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर शिबीरे अथवा कार्यशाळा राबवत असते.
आजकाल आॅनलाईनच्या ई काॅमर्सच्या व्यासपीठातूनही ग्राहक आणि विक्रेता यांच्यात कोट्यवधींचे व्यवहार केले जातात. राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकावर (एनसीएच) वर ग्राहकांनी नोंदवलेल्या ई-कॉमर्स बाबत तक्रारींच्या संख्येतही वाढ झाली आहे. यासाठी, राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकावर तक्रारींच्या नोंदीबरोबरच परतावा, बदली आणि सेवेतील कमतरता यासारख्या ग्राहकांच्या सामान्य तक्रारींचे जलद निराकरणही होते, याची खात्री करण्यासाठी, राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकाला तांत्रिकदृष्ट्या मजबूत केले जात आहे.
राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक, खटला दाखल करण्या पूर्वीच्या स्तरावर पर्यायी विवाद निवारण यंत्रणा म्हणून काम करते, ज्यामध्ये ग्राहक ‘१९१५’ वर कॉल करून किंवा मोबाइल अॅपद्वारे सहजपणे त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक, याच्याशी अलीकडेच जोडण्यात आलेल्या मैथिली, काश्मिरी आणि संथाली या भाषांसह देशातील एकूण १७ भाषांमध्ये सेवा देतो. त्याशिवाय ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून तक्रार दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी, ई-दाखिल पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे.
जागतिक ग्राहक हक्क दिनाची प्रेरणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दिवंगत जॉन एफ केनेडी यांच्याकडून घेतली गेली. त्यांनी १५ मार्च १९६२ रोजी युएस कॉंगेसला एक विशेष संदेश पाठवण्यात आला.. यामध्ये त्यांनी ग्राहकांच्या हक्कांचे मुद्दे ठळकपणे मांडले. असे करणारे ते पहिले जागतिक नेते होते. त्यानंतर ग्राहक चळवळीने १९८३ मधली तारीख ठरवली. त्यानंतर १५ मार्चपासून ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहकांच्या महत्वाच्या समस्यांवर योग्य दिशा देऊन त्या सोडविण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. अशा अनेक उदाहरणं डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेल्या कारवाईचा उजाळा करण्यात आला.व जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा. राशन दुकान संघटनेचे अध्यक्ष गजानन राऊत, निलेश पाटील, बाबाराव पवार, आझमभाई, वैराळे दादा, राठोड, एजाज, सुधाकर भोंगळे ,लईकभाई शहरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन सुधाकर चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन अन्नपुरवठा विभाग निरीक्षण अधिकारी रूपालीताई सोळंके यांनी केले
0 Comments