Ticker

6/recent/ticker-posts

पं. स. सदस्या मिनाताई सचिन राऊत यांचा पुढाकार मुंगसाजी महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

मंगरुळपीर तालुक्यातील गणेशपुर येथे मुंगसाजी महाराजांच्या पालखीचे ऊत्साहात स्वागत
मंगरूळपीर :- अकोला येथील मुंगसाजी नगरमधील मुंगसाजी महाराज पालखी सोहळ्याचे मंगरुळपीर तालुक्यातील गणेशपुर येथे आगमण झाले. या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गेल्या आठ वर्षापासुन मुंगसाजी महाराजांची पालखी मंगरुळपीर तालुक्यातील गणेशपुर येथे पं.स.सदस्या सौ. मिनाताई सचिन राऊत यांच्या घरी पालखीमधील भाविक आणी गावकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येत असते. याहि वषी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत करुन यावेळी भाविकांना भोजनदान करण्यात आले. स्वतः पं.सदस्या मिनाताई राऊत आणी सामाजिक कार्यकर्ते सचिन राऊत यांनी पालखी खांद्यावर घेवून मिरवणुकीत सहभागी होवुन एक धामीक आदर्श निर्माण केला. यावेळी भाविक भक्तासह गावकरी व परिसरातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात ऊपस्थीती होती.गावात पालखी दाखल होताच विना घेण्यासाठी शिरू सचिन राऊत यांनी पुढाकार घेतला होता व तुळशी घेण्यासाठी भक्ती सचिन राऊत यांनी तरुण पिढीला भक्ती मार्गातून कशाप्रकारे आनंद मिळतो या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून सचिन राऊत व परशु भाऊ राऊत यांनी व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले साधु संत येती घरात तोचि दिवाळी दसरा , धन्य आज दिन संत दर्शनाचा गणेशपुर नगरीत पहावयास मिळाले

Post a Comment

0 Comments