Ticker

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढणार; निवडणूक आयोगाकडे केलेली तक्रार काय ?

कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी प्रचार करत असतांना आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे  केलेल्या तक्रारीत प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान कसबा पेठ मतदार संघ हिंदुत्ववादी आहे. त्याच वेळी पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख करत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने पुण्येश्वर मंदिराच्या बाबत भूमिका स्पष्ट करावी असं म्हंटलं होतं. याच विधानाचा आधार घेत रवींद्र धंगेकर यांनी तक्रार केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देऊन रवींद्र धंगेकर आरोप केला आहे. निवडणूक प्रचाराच्या वेळी धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केल्याचा मुद्दा मांडला आहे.

उपूमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा करत त्यांच्यावर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी तक्रार दाखल करत निवडणूक आयोगाकडे रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहे. कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून हेमंत रासने यांना मैदानात उतरविण्यात आले होते. अत्यंत चुरशीची अशी निवडणूक पाहायला मिळाली होती.कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून प्रचार करत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, यांच्यासह राज्यातील मंत्री तळ ठोकून होते. तर कॉंग्रेसकडून नाना पटोले यांच्यासह कॉंग्रेसच्या प्रदेश स्तरावरील नेत्यांनी कसबा मतदार संघात मुक्काम ठोकला होता.

अतिशय प्रतिष्ठेची झालेली ही निवडणूक अखेरच्या टप्प्यात पैसे वाटपाच्या आरोपावरुन राज्यभर चर्चेत आली आहे. रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांच्या कडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत उपोषण सुरू केले होते. त्यावरुन मोठं रणकंदन पुण्यात माजले होते.

दरम्यान यावर भाजप कडून रवींद्र धंगेकर असे स्टंट करत असतात असा दावा करत त्यांच्यावर सडकून टीका केली होती. याच दरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे.


Post a Comment

0 Comments