करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
यावेळी पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, वाशिम च्या खासदार भावना गवळी यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मोठे केले. तरीही त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गद्दारांसोबत जाण्यासाठी
पुढाकार घेतला. संजय राठोड यांना शिवसेनेने आधी जिल्हाध्यक्ष केले, आमदार बनविले, उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रीही केले. त्यांनीही बेईमानी करून गद्दारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या चित्रा वाघ यांनी आंदोलन करून पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड दोषी असून त्यांची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे असेही यावेळी चंद्रकांत खैरे यांनी ठणकावून सांगितले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप ज्या ठिकाणी त्यांचे सरकार नाही त्या राज्यातील सरकार पाडण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून सत्ता हाती घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
भाजपवाल्यांकडे एवढा मोठा पैसा आला कुठून असाही सवालही यावेळी चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला. भाजप बदल्याचे राजकारण करत आहे. बदल्याचे राजकारण जास्त दिवस चालणार नाही आगामी निवडणुकांमध्ये मतदारच त्यांना धडा शिकवतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात चांगलं काम केलं. जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. ही बाब महाराष्ट्रातील जनताच सांगते. गद्दारांनी शिवसेना आपली समजू नये असेही खैरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस आणि भाजप शिवसेना संपवण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरत आहेत. शिवसेना ही बाळासाहेबांची असून शिवसेना गद्दारांना त्यांची जागा दाखवून आगामी निवडणुकीत त्यांना पराभूत करणार असल्याचेही यावेळी चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
येत्या ३० मार्च रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहरादेवी येथे येणार आहेत. याप्रसंगी पोहरादेवी येथे विदर्भासह राज्यातील हजारो शिवसैनिकांची उपस्थिती राहणार असून गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आता शिवसैनिक तयार असल्याचेही यावेळी खैरे यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, युवा सेना कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे, युवा सेना राज्यविस्तारक शरद कोळी, युवा सेना सचिव दुर्गा शिंदे, संपर्कप्रमुख दिलीप जाधव, जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कव्हर यांचे सह वाशिम जिल्ह्यातील शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments