Ticker

6/recent/ticker-posts

फळांचा केक कापून युवा सामाजिक कार्यकर्ता शेख नवेद यांचा वाढदिवस साजरा

मंगरूळपीर : शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळांचा सन्मान होऊन त्यांची विक्री वाढावी, या उद्देशाने मंगरूळपीर येथील युवकांनी, टरबूज व खरबूज या दोन फळांपासून अगदी जमेल तसा केक तयार करून त्यांचा मित्र तथा युवा सामाजिक कार्यकर्ता शेख नवेद याचा वाढदिवस साजरा रीज समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.सध्या सगळीकडेच चौकाचौकात तरुण मुंल आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करताना दिसतात .यामध्ये पाचशे ते हजार रुपयांपर्यंतचा केक आणून तो कापतात आणि तो केक कापून तोंडाला फासतात. यामुळे एक प्रकारे अन्नाची नासाडी होते. दुसरीकडे बाजारात व्यापारी हीच फळे अव्वाच्या सव्वा किमतीला विकतो. शेतकऱ्यांकडून मात्र कवडीमोल भावाने खरेदी केली जातात. ही बाब लक्षात घेत समाजापुढे नवा आदर्श निर्माण करण्यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ता शेख नवेद याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी कच्च्या फळांपासून केक तयार केला होता. फळांपासून तयार केलेला केक आकर्षक दिसत असल्याने हा नाविन्यपूर्ण केक पाहण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली. उपस्थितांनी या फ्रूट केकचा आस्वाद घेतला. प्रत्येकाने यापुढे अशाच पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प करावा, अशी भावना जनसेवक संजु आधार वाडे यांनी यावेळी व्यक्त केली. अशा कार्यक्रमांमुळे गावातील प्रत्येक कुटुंबाने कलिंगड, खरबूज, चिक्कू, द्राक्ष, पपई आदी फळे घरी दररोज खाण्यास सुरवात केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल.यावेळी संजू आधार वाडे, दिनेश जाधव, युनूस खान, चक्रनारायण. बाळू पाटील सुर्वे, मनिष पाटील गहूले, सचिन मांढरे, किशोर राठोड. इक्बाल सौदागर, फैजान खान, अंकुश डोके, सुजित भगत. आदि कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments