Ticker

6/recent/ticker-posts

शहीद हुतात्मा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या शहीद दिवस या निमित्ताने श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने



"एक शाम शहीदो के नाम"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन माजी राज्यमंत्री श्री.सुभाषरावजी ठाकरे साहेब प्रमुख वक्ते श्री.अटलजी पांडे धर्मप्रसार प्रमुख विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत,श्रीरामनवमी शोभायात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष श्री.संजयजी मिसाळ,उपाध्यक्ष श्री.नरेंद्रजी बजाज,प्राध्यापक ठाकूर सर,श्री.पुरुषोत्तमजी चितलांगे, श्री.श्यामभाऊ खोडे,श्री.रामदासजी सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करून द्वीपप्रज्वलन करण्यात आले तसेच समाजसेवी व्यक्ती तथा संस्थांचा गौरव करण्यात आला
माजी राज्यमंत्री श्री.सुभाषरावजी ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मंगरूळ परिसरातील हुतात्म्यांच्या नावांचा उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली वाहिली तर भारतरत्न गाण कोकिळा यांच्या ए मेरे वतन के लोगो या गाण्याची सुद्धा आठवण श्रोत्यांना करून दिली.
प्रमुख वक्ते श्री.अटलजी पांडे म्हणाले की गुलामीचा कल केवळ 150 वर्षाचा नसुन तर ते १३०० वर्षाचे स्वातंत्र युद्ध होय आणि त्यासाठी महाराणा प्रताप,गुरु गोविंद सिंह स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांपासून  तर शहीद हुतात्मा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्यापर्यंत अनेक देशभक्तांनी या भारत मातेसाठी प्राणांची आहुती दिली. माता-भगिनींनी जोहर केला आणि आज स्वातंत्र्यानंतर सुद्धा आम्ही विचारांची लढाई लढतो आहे स्वतंत्रवीर सावरकरांचा अपमान पदोपदी आजही होत आहे देशाच्या सीमेवर शहीद होणाऱ्या शहिदांच्या संख्येपेक्षा देशांतर्गत लढ्यात जास्त जवान शहीद झाले आहेत त्यासाठी आम्हाला जागरूक आणि सतर्क असण्याची आवश्यकता आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याची तुलना इतर कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्यलढाशी होऊ शकत नाही देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांची गंगा येथे वाहली परंतु देशात आजही कितने अफजल मारोगे असे नारे लागतात ही स्वातंत्र्याची विटंबनाच म्हणावी लागेल त्या शहिदांना एका सायंकाळी नमन करून होणार नाही तर प्रत्येक सायंकाळ प्रत्येक दिवस हा त्या शहिदांच्या स्मृतीत आठवणीत असला पाहिजे. देशाच्या उन्नतीसाठी आपला सहभागा अत्यंत आवश्यक असून त्यासाठी भ्रष्टाचाराला सुद्धा विरोध झाला पाहिजे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.सुनीलजी मालपाणी यांनी,कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सतीश हिवरकर यांनी  श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या छोट्याश्या लोट गाडी पासुन सुरुवात ते आजपर्यंतच्या भव्य शोभायात्रे पर्यंतचे वर्णन केले. तर आभार प्रदर्शन दिनेश वाघ यांनी केले.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने झाली.

Post a Comment

0 Comments