Ticker

6/recent/ticker-posts

आईच्या दीर्घायुष्यासाठी सयाजी शिंदेंचा अनोखा उपक्रम


तुझ्या वजनाइतक्या बिया महाराष्ट्रभर लावतो. म्हणजे मग त्या झाडाला आलेल्या फुलांच्या सुगंधात तू असशील. त्या झाडांच्या फळामध्ये दिसशील, सावलीत असशील आणि कायम राहशील.'


मराठी आणि हिंदी चित्रपटांचे अभिनेते सयाजी शिंदे आपल्या सामाजिक कार्यामुळे बरेच चर्चेत असतात. मराठी आणि हिंदी व्यतिरिक्त त्यांनी तमिळ, तेलगू, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी चित्रपटातही काम केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पोस्ट केलेली एक सोशल मीडिया पोस्ट बरीच चर्चेत होती.आपल्या आईला उदंड आयुष्य लाभावं, आई वडील निरोगी राहावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. हीच भावना मनात ठेवून सयाजी शिंदेंनी हाती घेतला उपक्रम लोकांना फार आवडला. यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. सोशल मीडियावरही या उपक्रमाची चांगलीच चर्चा झाली

सयाजी शिंदेंनी आपल्या आईला दीर्घायुष्य लाभण्यासाठी तिच्या वजानाइतक्या बिया लावण्याचं ठरवलं. एका कार्यक्रमात ते म्हणाले होते, ''माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. सगळ्यांनाच वाटतं की आईला भरपूर आयुष्य मिळावं. मलाही माझी आई कायम जीवंत हवीये. मी आहे तोपर्यंत ती जिवंत कशी राहील...

म्हणून तुझ्या वजनाइतक्या बिया महाराष्ट्रभर लावतो. म्हणजे मग त्या झाडाला आलेल्या फुलांच्या सुगंधात तू असशील. त्या झाडांच्या फळामध्ये दिसशील, सावलीत असशील आणि कायम राहशील.' झाडं लावण्याचं सामाज कार्य मी करत नाहीये. मला आधीपासूनच याची आवड आहे आणि आईला दिलेल्या वचनानुसार तिच्या वजनाइतकी झाडं लावण्यासाठी मी काम करत आहे.प्रत्येकालाच आई वडीलाचं ऋण फेडण्यासाठी माता आणि धरतीमाता यांच्याइतकं जगात मोठं असं काहीच नाही.'' सहयाद्री देवराईत त्यांनी आत्तापर्यंत भरपूर झाडं लावली आहेत.अलिकडेच त्यांनी सोशल मीडियावर ''आपली होती होळी, पशू-पक्ष्यांच्या आयुष्याची होते राख रांगोळी असं म्हणत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.'' येऊरच्या जंगलात वणवा लागल्यानं निर्माण झालेली दुरावस्था यांनी दाखवली आहे.


Post a Comment

0 Comments