अपील केल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली अशी अनेक उदाहरणं आहेत माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 19 ( 1) नुसार अपील निकाल पत्र दिनांक 9/3/ 2023 रोजी
प्रस्तुत प्रकरणी अपिलार्थी यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम १९/१ मधिल तरतुदी नुसार अर्जदार यांनी न.प. अर्ज आवक क्र. ९७५८ दि.२०.०२.२०२३ रोजीच्या अर्जान्वये अपील दाखल केलेली होती. सदर प्रकरणाच्या सुनावणीचे वेळी अपिलार्थी स्वत: हजर व जन माहिती अधिकारी हे दोघेही दोन्ही वेळ गैरहजर होते. अपिलार्थी यांनी माहिती अधिकार अर्जानुसार माहिती अधिकार अधिनियम २००५ अंर्तगत माहिती मागतली होती.
सदर मागितलेली माहिती न मिळाल्यामुळे, मागतलेली माहिती उपलब्ध करून देणे बाबत अपील अर्जात नमूद आहे.
अधिकारी फक्त वसुलीच्या धामधुमीत जिथून मिळेल दाम तिथलेच होईल काम. माहिती मागणाऱ्याला चाल पुढच्या लग्नाला वरिष्ठ अधिकाऱ्याने चौकशी करणे काळाची गरज .
ज्या अधिकाऱ्यांनी या नियमांमध्ये नमूद केलेल्या कालमर्यादेचे पालन केलेले नाही असे अधिकारी या नियमाचा भंग केल्याबद्दल दोषी असल्याने, वरील नियमांचे उल्लंघन करणाच्या नियमानुसार करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकारी करतील का असे जनसामान्यात बोलले जात आहे .
कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध / कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करणे अपेक्षित आहे नाहीतर माहितीच्या अधिकाराला मुठ माती दिल्यासारखे होईल
0 Comments