वाशिम-
स्थानिक आर. ए. कॉलेज वाशिम येथे आज दिनांक 21 मार्च 2023 मंगळवार रोजी 'सुरभी सुरेश जाजू' यांच्या "इसेन्शियल ऑफ इंग्लिश ग्रामर केजी टू पीजी", पब्लिश बाय 'ब्ल्यू रोज पब्लिकेशन', नोएडा (युपी) या बुकचे अनावरण आर. ए. कॉलेज वाशिम येथील प्राचार्य डॉ. पगारिया सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या बुकच्या अनावरण सोहळ्यामध्ये फिजिक्स डिपार्टमेंटचे HOD डॉ. रिसोडकर सर, कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचे HOD डॉ. गवळी सर, तसेच डॉ. गोरे सर, गोटे सर, मुसळे सर, वाघमारे सर, पडवाल सर, वानखडे सर, खराटे सर व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमाला हजर होते. व तसेच या बुक बद्दल सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा व अभिनंदन दिले.
या बुक मध्ये तुम्हाला तुमच्या इंग्लिश ग्रामर बद्दलच्या सगळ्या अडचणी दूर होतील याची मला खात्री आहे. शीर्षकांमध्ये सांगितल्याप्रमाणे ही पुस्तक आपल्याला KG पासून तर PG पर्यंत उपयुक्त ठरेल. ही पुस्तक विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनी पण वाचावी ही आशा आहे. ही पुस्तक ऑनलाइन ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर तसेच ऑफलाइन लेखिकेकडे व तसेच प्रा. सुषमा जाजु, यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महािद्यालय, मंगरुळपीर येथे उपलब्ध आहेत.
0 Comments