Ticker

6/recent/ticker-posts

वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा - पवन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी

काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य येथे जागतिक वन दिवस साजरा 
                       
प्रतिनिधी:- सचिन राणे

वाशिम अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य येथे जागतिक वन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य व साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा राष्ट्रीय सेवा योजना च्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी अनिल निमजे सर तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मंगरूळपीर येथील प्रा. डाॅ. संजीव इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधल वनपाल तुपकर यांची उपस्थिती होती. 
        


यावेळी यशंवतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय मंगरूळपीर येथील विद्यार्थींना यावेळी काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये निसर्ग पाऊल वाट ने वन भ्रमंती चे आयोजन करण्यात आले होते. तसेच अभयारण्य कडुन विद्यार्थींना बस व्दारे जंगल सफारी चे देखील आयोजन करण्यात आले होते.  यावेळी वनरक्षक निलेश खोडके व त्यांच्या चमुने विद्यार्थींना अभयारण्याबाबत तसेच पक्षी, किटक, वृक्ष, वन्यजीव याबद्दल वन भ्रमंती व जंगल सफारी च्या माध्यमातून सर्व माहिती दिली. यानंतर अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी निमजे यांनी उपस्थितांना जागतिक वनदिनी जंगला बद्दल व वनांबद्दल विस्तृत अशी माहिती देऊन पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. 
                  
  वनपरिक्षेत्र अधिकारी  पवन जाधव यांनी वनांचे महत्त्व आपल्या प्रास्ताविकामधुन पटवुन दिले. वन संवर्धनासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. तसेच वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. प्रा. डाॅ.संजीव इंगळे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थींसाठी जंगल सफारी चे आयोजन देखील वनविभागाकडुन करण्यात आले होते. यावेळी भरपूर पक्षी, वन्यजीवांचे दर्शन त्यांना झाले. निसर्ग पाऊल वाट ने विद्यार्थ्यींना जंगलाबद्दल इंस्तभुत अशी माहिती दिली. यावेळी काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य येथील वनाधिकारी तसेच कर्मचारी साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा चे स्वयंसेवक व यशंवतराव चव्हाण महाविद्यालय मंगरूळपीर येथील विद्यार्थींनीची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments