Ticker

6/recent/ticker-posts

शुक्रवारी वाशिम जिल्हयात शिवगर्जना मेळाव्याचे आयोजन

■ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मेळाव्याला उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कवर यांचे आवाहन


वर्ल्ड स्पीड न्यूज वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचा वृत्तसंकलन....
 वाशिम उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने वाशिम जिल्हयात ३ मार्च शाला शिवगर्जना अभियान
मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार युवासेना कार्यकारीणी सदस्य हर्षल काकडे यवासेना राज्य विस्तारक शरद
कोळी, युवासेना सचिव सी. दुर्गा शिंदे , दिलीप जाधव संपर्क प्रमुख आदींची उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान या कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडी, युवासेना, युवती सेना व समस्त आजी माजी पदाधिकारी शिवसैनिकांनी बहुसंख्येने हजर रहावे
 असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. सुधीर कवर यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहिती देतांना जिल्हा प्रमख डॉ सधीर कवर यांनी सांगितले की, ३ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता कारंजा मानोरा तालुक्यासाठी ठाकरे पॅलेस मानोरा येथे शिवगर्जना मेळावा होत असुन दुपारी १ वाजता वाशिम- ॥ मंगरुळपीर तालुक्यासाठी विठ्ठलवाडी सभागृह वाशिम, तर दुपारी ४ वाजता रिसोड मालेगाव तालुक्यासाठी विश्वा लॉन रिसोड येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments