रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे येथे झालेल्या एका पार्टीदरम्यान तरुणीचा होणाऱ्या पतीसोबत अश्लिल व्हिडीओ बनविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. संबंधित तरुणीच्या हा प्रकार लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता तिने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस प्रशासनाने तपासाचे चक्र फिरवून त्यानुसार पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत संशयित आरोपींपैकी एकाला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाचणे येथे एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टील तक्रारदार तरुणी ही तिच्या
होणाऱ्या पतीसह उपस्थित होती. तसेच याठिकाणी आरोपी पुरूष तसेच त्याची मैत्रिण व अन्य दोन अल्पवयीन उपस्थित होते. पार्टी सुरू असतानाच तक्रारदार व तिचा होणारा पती एका खोलीत असताना त्यांचा अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आल्याचा तरुणीला संशय आला त्या तरुणीने तक्रार दिल्यामुळे.
आपला व्हिडीओ संबंधितांकडून समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला, असा संशय पीडितेला आला. त्यानुसार या महिलेने चौघा संशयितांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी एक पुरूष व त्याची मैत्रिण, तसेच दोन अल्पवयीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
0 Comments