जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज व मागणी
मंगरूळपीर/प्रतिनिधी :- येथील भ्रष्ट प्रव्रुतीने बरबटलेली,तर राज्यांत स्वच्छतेचा पुरस्कार घेणारी बहुचर्चित नगर परिषद ला कोणी वाली नसल्याने शहरातील जनतेच समस्या चे सध्या वाटोळं काढल्या जात असुन सध्या मार्च एंड असल्याने अधिकारी व अधिकार नसलेले नगरसेवक हे फक्त बिले लाटण्यात व्यस्त दिसुन येते,या मुलभुत गरजा पुरविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शहरातील अशोक नगर, परीसरात सध्या नाली गटारातील घाण पाणी रस्त्यावर घरा समोर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली ज्यामुळे लहान मुलांना साथी च्या आजारासह इतर रोगाची लागवन होत आहे,तर गल्लीबोळातून येरझारा करणाऱ्या पादचाऱ्यांना दुर्गंधीतुन प्रवास करावा लागतो,तर या घाण पाण्यामुळे आप आपसात विवादाचे स्वरूप पहायला मिळतात, अनेक निवेदने देण्यात आली मात्र,मुजोर व भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी हे फक्त वसुली व कमीशन खान्यात मग्न असल्याने येथील नागरिकांना याचा खामीयाजा आपला जिव गमाऊन तर भोगावा लागणार नाही ना ? अशी कुजबूज सुद्धा महिला भगीनी करत आहे, येथे लाभलेले मुख्याधिकारी सावध यांचे कडुन शहरवासीयांना बऱ्याच अपेक्षा होत्या मात्र,ते ही येथील कमिशनखोरीच्या बाहुपाशात अडकल्याने, शहरातील शहरवासीयांना मायबाप वाली नसल्याने आता खुद्द जिल्हाधिकारी शन्मुखराजंन यांनीच येथील कायमचेच पायबंद करावे व मुलभुत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालवावे अन्यथा लवकरच मोठे आंदोलन करू व समोरील ऊद्भवनाऱ्या समेस्येस सर्वश्रुत जबाबदार येथील अधिकारी व कर्मचारी राहतील,असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
कमिशन मिळते तेच कमी होतात गोरगरिबांना मात्र कामासाठी चक्रास मारावे लागतात.
0 Comments