वाशिम - कोट्यावधी रुपये खर्चून न.प. च्या वतीने शहरात राबविण्यात आलेल्या भूमिगत गटार योजनेचा बोजवारा उडाला असून देखभालीअभावी या गटारात कचरा व प्लॉस्टीकपन्न्या साचल्या आहेत. तसेच संबंधीत यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे या गटाराची साफसफाई करत असतांना झालेल्या सफाई कामगार मृत्युप्रकरणी संबंधीत दोषींवर त्वरीत गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, शहरात कोट्यावधी रुपये खर्चून राबविण्यात आलेल्या भूमिगत गटार योजनेची संबंधीत यंत्रणेच्या योग्य देखभालीअभावी एैशीतैशी झाली आहे. या गटारामधील वाहक पाईपमध्ये ठिकठिकाणी कचरा व प्लॉस्टीक पन्न्या अडकल्यामुळे पाणी तुंबुन रस्त्यावरुन वाहत आहे. तसेच ही गटारे साफ करणार्या सफाई कर्मचार्यांना आवश्यक साहित्य व सुरक्षा किट सुध्दा उपलब्ध नाही. संबंधीत यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षीतपणामुळे काही दिवसापुर्वी शहरातील अकोला नाका परिसरात गटार साफ करतांना एक कर्मचारी मयत झाला असून दुसर्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी संंबंधीत दोषींवर त्वरीत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस विभागाला द्यावेत व सफाई कर्मचार्यांना आवश्यक किट व साहित्य उपलब्ध करुन द्यावेत अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्यासह शहर उपाध्यक्ष प्रतिक कांबळे, गणेश इंगोले, महिला संघटीका वंदना अक्का, शेतकरी सेनेचे रघुनाथ खुपसे यांची उपस्थिती होती.
0 Comments