Ticker

6/recent/ticker-posts

प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांची पुंजानी यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट

     राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तसेच माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी स्थानिक पुंजानी कॉम्प्लेक्स येथे सदिच्छा भेट देऊन उपस्थित  पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान मो. इमरान पुंजानी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 
     
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी  महिला प्रदेशाध्यक्ष व अमरावती जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुरेखाताई ठाकरे,  युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सरगर, विभागीय अध्यक्षा वर्षाताई निघम व अमरावती जिल्हापक्ष निरीक्षक सोनालीताई ठाकूर यांचे ही शाल व श्रीफळ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी व्यापारी असोसिएशन वाशिम चे अध्यक्ष गोविंद वर्मा, महेश ठाकूर, कारंजा न.प. गटनेता ॲड. फिरोज शेकूवाले, नगरसेवक जाकीर शेख,सलीम गारवे,सलीम प्यारेवाले, अ रशीद,युनूस खान पहलवान,सै मुजाहिद,मुन्ना ठेकेदार, उस्मान खान,मुजाहिद खान,समीर पठाण,वहिद शेख,सदिम नवाज व डा धनराज इंगोले आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments