अकोला.............................. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा सन 2018 चा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार वितरण सोहळा चे आयोजन सामाजिक वनीकरण विभागा अकोला च्या वतीने न्यू खेतान नगर, कौलखेड येथील प्राजक्ता शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे हे होते .तर प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप शिरसाठ, सेवाश्री बहुउद्देशीय संस्थेच्या कोषाध्यक्ष समाजसेवि सौ अलका सगने, प्राजक्ता कन्या शाळेचे मुख्याध्यापक सागरजी देशमुख, सत्कारमूर्ती उद्योजक व निसर्ग वैभव संस्थेचे अध्यक्ष संजय शर्मा, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण इंगळे आदी मान्यवर विचार पिठावर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2018 मध्ये देण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारासाठी अमरावती विभागातून या पुरस्कारासाठी अकोला येथील उद्योजक तसेच निसर्ग वैभव संस्थेचे अध्यक्ष संजयजी शर्मा यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड महाराष्ट्र शासनाने केली होती . त्या पुरस्कार वितरण सोळ्याचे आयोजन सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने करण्यात येऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संजयजी शर्मा यांना सन्मानपूर्वक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .त्यामध्ये वीस हजार रुपये नगदी चे डिपॉझिट प्रमाणपत्र, शाल ,श्रीफळ , सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन देऊन त्यांना ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका किरण खैरे तर आभार प्रदर्शन अकाउंटन विजय देशमुख यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल दत्ता पिंजरकर, सावळे मॅडम, वनरक्षक राज्यपाल तेलगोटे, शरद महाकाळ, राजुरकर साहेब, चंदू पडवाल आदीनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला . कार्यक्रमाला प्राजक्ता शाळेचे विद्यार्थी , शिक्षक ,कर्मचारी तसेच सामाजिक वनीकरण विभाग चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत परंतु उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments