विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे देशभर दिनांक 12 मार्च ते 19 मार्च 2023 पर्यंत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 12 मार्च 2023 रविवार रोजी मंगरूळनाथ येथील हिंदू स्मशानभूमी येथे श्रमदान करण्यात आले.
सेवा सप्ताह निमित्त संपूर्ण जिल्ह्यात मठ मंदिरांची स्वच्छता तसेच स्मशानभूमीची सुद्धा स्वच्छता श्रमदानातून करण्यात येईल अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री सतीश हिवरकर यांनी दिली याप्रसंगी अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी श्रमदानात भाग घेतला.
0 Comments