Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्ह्यात नाट्यपरिषद निवडणूक रणधुमाळी.

        
  "नाट्य कलावंताच्या उज्वल भवितव्याकरीता नंदकिशोर कव्हळकर व उज्वल देशमुख यांना विजयी करा."-सईताई डहाके.                                          
                                                   अ भा.मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ निवडणूकीच्या प्रचाराची मुहूर्तमेढ.                                                         
वाशिम : वाशिम जिल्ह्यामध्ये,अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मंडळ मुंबईच्या सन २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक कालावधीची निवडणूक लागलेली असून,निवडणूकीत,सातत्याने, शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,आध्यात्म,नाटयक्षेत्रातील नाट्य कलावंत व लोककलावंताच्या न्याय्य हक्काकरीता गेल्या पंचवीस वर्षापासून सक्रियपणे कार्यरत राहून,सर्वांशी प्रामाणिक, मनमिळाऊ, विश्वासू असलेले नाटय कलावंताचे प्रभावी नेतृत्व म्हणजे प्रथम क्रमांकाचे उमेदवार कारंजा येथील नंदकिशोर अंबादास कव्हळकर आणि वाशिम येथील सातव्या क्रमांकाचे उमेदवार उज्वल दत्तात्रय देशमुख हे असून नाट्यकलावंत मतदारांनी त्यांनाच आपले अमूल्य मत देऊन,आपल्या वाशिम जिल्ह्यामधून नियामक मंडळावर निवडून देण्याचे आवाहन कारंजा येथील,राजकिय क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सईबाई प्रकाशजी डहाके आणि माजी नगराध्यक्ष विजय बगडे यांनी केले आहे. याबाबत संजय कडोळे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार अधिक वृत्त असे की,नाट्य कला क्षेत्रात कारंजा नगरीचे योगदान अमूल्य असून,अखिल भारतिय नाट्य परिषदेकडून नाट्य कलावंताच्या पुष्कळ अपेक्षा आहेत. व त्या अपेक्षांच्या पूर्ततेकरीता अ.भा.नाट्य परिषद नियामक मंडळावर सदस्य म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन कार्य करणाऱ्या प्रामाणिक, मनमिळाऊ,विश्वासू व आपल्या माणसाची निवड होणे आवश्यक असल्यामुळे लोकआग्रहास्तव कारंजा येथील नंदकिशोर अंबादास कव्हळकर व वाशिम येथील उज्वल दत्तात्रय देशमुख यांनी आपली उमेद्वारी दाखल केलेली असून,मतदान पत्रिकेवर प्रथम क्रमांकावर नंदकिशोर अंबादास कव्हळकर आणि सातव्या क्रमांकावर उज्वल दत्तात्रय देशमुख यांचे नाव असून मतदारांनी त्यांच्या पहिल्या व सातव्या क्रमांकावर खूण करून त्यांना,रविवार दि १६ एप्रिल २०२३ रोजी नगर परिषद प्राथ शाळा, दिघेवाडी, वाशिम ; विश्वप्रयाग कॉम्प्युटर्स एज्युकेशन, रेणुका लॉन, टिळक चौक कारंजा (लाड) ; किंवा जि.प. मराठी शाळा, पो.स्टे. जवळ, जुने शहर, मानोरा यापैकी कोणत्याही मतदान केन्द्रावर जाऊन,मतदान करावयाचे आहे. नुकतीच त्यांच्या प्रचाराची मुहूर्तमेढ ,श्री नृसिह सरस्वती स्वामी संस्थान कारंजा येथे, कारंजा येथील राजकिय क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्त्या सईताई प्रकाशजी डहाके यांच्या शुभहस्ते प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आली.यावेळी झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून माजी नगराध्यक्ष विजय बगडे आणि नाट्य परिषदेच्या राधाताई मुरकुटे,विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदिप वानखडे यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम उमेदवार नंदकिशोर कव्हळकर आणि उज्वल देशमुख यांनी श्री गुरुमाऊली श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे पूजन व दर्शन करून शुभाशिर्वाद घेतले.       आपल्या मनोगतातून बोलतांना नंदकिशोर कव्हळकर व उज्वल देशमुख यांनी कारंजा येथील नाटय कलावंत आणि नाट्य रसिकांचे समाजप्रबोधन मनोरंजनाच्या कार्यक्रमाकरीता, गेल्या अनेक वर्षा पासून स्वमालकीचे नाट्यगृह मिळालेले नाही.परंतू नाट्यगृह किंवा सांस्कृतिक भवनाची मागणी  पूर्णत्वास नेण्यास तसेच आपल्या जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील सर्व कलावंताना त्यांचे न्यायहक्क शासनाकडून मिळवून देण्याकरीता आम्ही बांधील असू . मागील जवळ जवळ तिन वर्षे कोव्हिड १९ कोरोना महामारीमुळे केवळ नाट्यक्षेत्रातच नव्हे तर इतरही क्षेत्रातील सर्वच विकास कामे बंद पडलेली होती.परंतु येत्या पंचवार्षिक मध्ये निश्चितच आम्ही हा अनुशेष आम्ही प्रकर्षाने भरून काढूच. हा आमचा दृढ आत्मविश्वास असल्याचे त्यांनी सांगतिले .यावेळी कारंजा येथील
 हर्षा दर्यापुरकर,आशा कव्हळकर,ज्योत्स्ना भेलांडे, विजय बगडे,रविंद्रजी चवरे, विठ्ठलराव कुटे,डॉ. सतीष दुरगकर,डॉ. गावंडे,दिनेश कडोळे पांडुंग माने,मोहित जोहरापूरकर, रविंद्र नंदाने,अतुल धाकतोड ,उमेश अनासाने, वानखडे अनिल भेलांडे,डॉ. ज्ञानेश्वर गरड,रोमिल लाठीया
 ,निळकंठ काळे,गुलाब पापळे, 
आनंद खेडकर इत्यादिची उपस्थिती होती.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे उमेश अनासाने यांनी कळवीले आहे.

Post a Comment

0 Comments