गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये धडकी भरवली आहे. अतिवृष्टीमुळे यंदा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी उभारी घेत रब्बीची पेरणी केली. पण आता अवकाळी पावसाने तेही हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे
अमरावती : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाज खरा ठरत असून राज्यात अवकाळी पावसाने ऐन होळीच्या सणाला दाणादाण उडवली आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात अवकाळी पावसने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. बळीराजाने मोठ्या कष्टाने पिकवलेलं पावसाने धुवून काढलं. अवकाळी पावसाच्या या धुळवडीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. नाशिक, धुळे, जळगाव, पालघर, बुलडाण्यासह अमरावतीत आणि राज्यातील इतर जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे.
अमरावती जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमध्ये धुळवडीच्या दिवशी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते. पावसाने सकाळपासूनच अनेक ठिकाणी हजेरी लावली. पश्चिम विदर्भात सध्या हरभरा काढणीला आला आहे. तर गहू काढणीच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत पावसाचा फटका बसला असून प्रतवारी घसरण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
पश्चिम हिमालयावर पश्चिमी विक्षोभ द्रोणिकेच्या स्वरूपात सक्रिय आहे. तसेच उत्तर गुजरातवर चक्राकार वारे वाहत आहेत. याच्या परिणामामुळे ५,६,७ आणि ८ मार्चपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी आणि गडगडाटाचा अंदाज वर्तवला आहे.
अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. ७ मार्चपासून संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. ८ मार्चला अमरावती, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.पुढील चार दिवस कमाल तापमान विशेष बदल होणार नाही. त्यानंतर पुन्हा तापमान २-३ अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात विशेष बदल होणार नाही, असा अंदाज हवामान तज्ज्ञ प्रा डॉ. अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे.

0 Comments