Ticker

6/recent/ticker-posts

लाखपुरी येथील दीपक चव्हाण यांची म्हैस सर्पदंश ने दगावली आर्थिक मदतीची मागणी....


       

प्रतिनिधी -अतुल नवघरे           

लाखपुरी :११ , मुर्तीजापुर तालुक्यातील लाखपुरी येथील दीपकसिंग चव्हाण यांची कडे १  म्हैस होती .सदर म्हैस ही सहा महिन्याआधी त्यांनी ६० हजार रु. ची  म्हैस विकत घेतली होती त्या म्हशीवर ते त्यांचा घराचा उदरनिर्वाह करत होते. परंतु दिनांक -८-०३-२०२३ रोजी सकाळी ५ वाजता. नेहमीप्रमाणे दीपक चव्हाण कोठ्या मध्ये झाडजूळ करण्याकरिता गेले असता. त्यांना म्हैस पडताना दिसली . ते पाहायला गेले तर  सर्पदंशाने त्यांची म्हैस मृत्युमुखी पडलेली दिसली . त्यांनी क्षणाचा विलंब न करता दिपक चव्हाण यांनी  तात्काळ पशुवैद्यकीय डॉक्टर व तहसीलदार मूर्तिजापूर यांच्याशी संपर्क केला . घटनास्थळी डॉक्टरांचे पथक तात्काळ येऊन त्या म्हशीचा पंचनामा करून सदर म्हशीचे पिएम करण्यात आले.   यावेळेस लाखपुरी येथील प्रभारी सरपंच राजप्रसाद कैथवास ,ग्रामिण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अतुल नवघरे , धर्मेंद्रसिंग चव्हाण ,लाखपुरी येथील तलाठी बोळे , पोलिस पाटील दामोदर सुरजुसे , डॉ. आर. आर . काळे , पशुधन विकास अधिकारी डॉ . जयस्वाल , सह ग्रामस्थ उपस्थित होते.दीपक चव्हाण यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. .                                                                               

"लाखपुरी दीपक चव्हाण यांची म्हैस  सर्पदंशाने दगावली असुन  शासनाच्या जीआर नुसार व नैसर्गिक आपत्तीच्या मदत निधीनुसार व शासन स्तरावर जे मदत देता येईल ते लाभार्थ्यांना तात्काळ करावी.         

         
 
"माझी म्हैस घरात बांधली होती . अचानक सकाळी पाच दरम्यान मी उठलो असता. म्हैस पडल्याचा आवाज आला मी धावत गेलो . तर मला साप जाताना दिसत होता . तोपर्यंत म्हैस दगावली होती. माझा  उदरनिर्वाह त्या म्हैशीवर अवलंबून होता तरी मला शासन स्तरावरून आर्थिक मदत द्यावी.                         

  (दिपक चव्हाण ( लाखपुरी )

Post a Comment

0 Comments