वाशिम,
: बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत जागतिक महिला दिन 8 ते 14 मार्च 2023 या कालावधीत जिल्हयात राबविण्यात येणार आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कतृत्ववान महिलांचा सत्कार. 9 मार्च रोजी 8 मार्च 2023 रोजी जन्माला आलेल्या मुलींच्या पालकांचा शोध घेवून त्या पालकांचा सत्कार करुन मुलींच्या जन्माचे महत्व पटवून देणे व मुलींच्या जन्म दिनानिमित्त केळीची झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची पालकांकडून हमी घेणे. 10 मार्च रोजी किशोरवयीन मुलींची महिला सक्षमीकरण या विषयावर वक्तृत्व स्पर्धा. 11 मार्च रोजी स्वस्थ बालक/ बालीका (मुले व मुली) स्पर्धा. 12 मार्च रोजी कुपोषणमुक्त,स्त्रीभृण हत्या रोखणे व बेटी बचाओ बेटी पढाओ यावर रांगोळी स्पर्धा. 13 मार्च रोजी किशोरी,गरोदर व स्तनदा महिलांकरीता आहार व पाक कृती स्पर्धा व 14 मार्च रोजी महिलांच्या संबंधित कायदेविषयक महितीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात जिल्हयातील प्राथमिक व माध्यमिक शाळा,आरोग्य विभाग व प्रकल्पस्तरावर आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका यांच्या सहभागाने सप्ताह राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जोल्हे यांनी दिली.
0 Comments