इंडियन ऑइल ने 2 वर्षांपूर्वी इंडेन ग्राहकांच्या स्मार्ट किचन साठी अधिक सुरक्षित असे तीन लेअर असलेले 10 किलो कंपोझिट सिलेंडर मार्केट मध्ये लाँच केले होते
त्याच निमित्ताने महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त कंपोझिट सिलेंडर विक्री करणाऱ्या इंडियन ऑइल अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला
इंडियन ऑइल च्या महाराष्ट्र राज्य कार्यलयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात यवतमाळ वाशीम सेल्स एरिया मॅनेजर श्री निलेश ठाकरे यांचा उत्कृष्ठ सेल्स ऑफिसर म्हणून श्री अनिर्बन घोष, कार्यकारी निदेशक आणि राज्य प्रमुख महाराष्ट्र राज्य कार्यालय यांच्या हस्ते त्यांनी केलेल्या कामाबद्दल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
त्यावेळी कंपोझिट सिलेंडर चा महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक विक्री करणाऱ्या वितरकाचा सत्कार सुद्धा करण्यात आला
नवीन इंडेन कंपोझिट सिलेंडर महिला गृहिणी खूप पसंद करत आहेत आणि त्याची मागणी वाढत आहे
या कार्यक्रमात इंडियन ऑइल महाराष्ट्र राज्य कार्यलयातील सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते
0 Comments