भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी खळबळजनक विधान केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढविण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे शिंदे गटाला 48 जागाच वाट्याला येणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. येत्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. बावनकुळेंच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेय. मात्र, भविष्यात कोणता वाद उफाळू नये म्हणून भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सारवासावर केली आहे. अशी कोणतीही चर्चा कोअर टीममध्ये झालेली नाही, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मला याची माहिती नाही पण अशी कोणती चर्चा कोरअर टीममध्ये झालेली नाही. शिवसेनेला ( शिंदे गट ) किती जागा द्यायच्या आणि भाजपाने किती लढवायच्या या सर्व जागा आणि त्याचं वाटप हे त्या ठिकाणचे असलेल्या स्थानिक शक्तीच्या आधारावर होणार आहे याबाबत सर्वे दोन्ही प्रमुख पक्षांचे नेत्यांची चर्चा होईल. जिंकून कोण येईल या आधारावर जागेचा वाटप होईल, असे मुनगंटीवार म्हणाले.
मात्र, प्रदेश अध्यक्षांचे विधान कोणीही गमतीने घेणार नाही, अशी दुसरीकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राज्यात भाजपने 105 जागांवर विजय मिळवला आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेकडे 40 आमदार आहेत. त्यांना भाजप जास्तीच्या जागा देणार नाही, हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिंदे गटाला अधिकच्या 8 जागा मिळतील, अशीही चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या विधानात तथ्य असेल, अशीही एक चर्चा आहे. त्यामुळे आता शिंदे गट आपली पुढील काय भूमिका काय घेणार याची उत्सुकता आहे.
0 Comments