अकोला.....................
- समाज घडवणाऱ्या शिक्षण क्षेत्रावर सातत्याने अन्याय करणाऱ्या सरकारच्या विरोधात जागर करण्यासाठी संत गाडगेबाबा यांच्या कर्मभूमीत विविध संघटनांच्या माध्यमातून एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे.
भुमिपूञ अभियान सभागृहात सिरसो, दर्यापूर रोड येथे गुरुवारी दि.२३ला *'शहीद दीन'* चे औचित्य साधत हे जागर आंदोलन करण्यात येईल.स.११ ते ४ वाजेपर्यंत आयोजित केले आहे.
या आंदोलनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ, जुनी पेन्शन संघटना, एजेएफसी, राष्ट्रीय पञकार मिञ संघटना,अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, निर्भय बनो जनआंदोलन, ग्रामीण पत्रकार संघ, व्यसन मुक्ती संघटना, शेतकरी जागर मंच, संत वासुदेव महाराज भुमिपुत्र अभियान, शिक्षण संस्था चालक संघटना, अ. भा. गुरुदेव सेवा मंडळ तालुका सेवा समिती,लक्षेश्वर गुरुदेव सेवा मंडळ लाखपुरी,संकल्प क्रीडा मंडळ आणि अन्य काही संघटना या आंदोलनात सहभागी होत आहेत. शेतकरी जागर मंचचे प्रशांतदादा गावंडे, ज्येष्ठ समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जन आंदोलनाचे गजाननदादा हरणे, शिक्षण संस्थाचालक संघटनेचे विजयजी कौसल,विमाशिसंघ चे कार्यवाह तथा नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष जयदीप सोनखासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन होत आहे. शिक्षण क्षेत्राविषयी आस्था असणाऱ्या नागरिकांनी,शिक्षक-कर्मचा-यांनी जागरूक नागरिक महिलांनी या जागर आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी एका प्रसिद्ध पञकाद्वारे केले आहे.
0 Comments