Ticker

6/recent/ticker-posts

16 मार्चला कृती संगम कार्यशाळा

वाशिम दि.15
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) वाशिमच्या वतीने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेतून 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता नियोजन सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे कृती संगम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसूमना पंत यांची उपस्थिती राहणार आहे.
       कार्यशाळेला कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचे राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी संतोष वाळके,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे,नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार,मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त मनोज जयस्वाल, रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खांबाईत, पोकराचे विषय विशेतज्ञ मिलिंद अरगडे व जिल्हा संसाधन व्यक्ती गोपाल मुठाळ हे मार्गदर्शन करणार आहे. तरी या कार्यशाळेला शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन वाशिमच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments