Ticker

6/recent/ticker-posts

14 तारखेला मोर्चा काढुन कर्मचारी करणार बेमुदत संप


 

वाशिम दिनांक 12

जुनी पेंशन योजना लागु करा व इतर मागण्यासांठी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने दिनांक 14 मार्च पासुन राज्यस्तरीय बेमुदत संपाचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक 14 रोजी मोर्चा काढुन संपाला सुरुवात करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या लिपीक वर्गीय संघटनेचे जिल्हा सचिव रविंद्र  सोनोने यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील सरकारी- निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, नगरपालिका, नगरपंचायतीअंतर्गत सर्व सरकारी- निमसरकारी, कंत्राटी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 14 मार्च पासुन बेमुदत संप पुकारला आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व कर्मचारी या संपात सहभागी होत असुन मोर्चा काढुन सर्व कर्मचारी जिल्हा कचेरिवर एकत्र जमणार आहेत. याबाबत दिनांक 9 मार्च रोजी जिल्हा परिषद महासंघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क समिती आणि मध्यवर्ती कर्मचारी यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तात्या नवघरे, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क समिती चे जिल्हाध्यक्ष निलेश कानडे आणि जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विजय धुमाळ यांनी बैठकीमध्ये आंदोलनाबाबत भुमिका मांडली. दिनांक 14 रोजी जुन्या जिल्हा परिषद परिसरातुन अकोला नाका मार्गे पायदळ मोर्चा काढुन जिल्हाधिकारी कार्यालयात या मोर्चाचे रुपांतर धरणे आंदोलनात होणार आहे.

 


Post a Comment

0 Comments