आणि जीवनातील कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याची क्षमता महिलांमध्ये आहे, हा या कार्यक्रमाचा विषय होता
. या कार्यक्रमात विभागीय कार्यालय व शाखेचे कर्मचारी सहभागी झाले होते. आजूबाजूच्या निवासस्थानी/सोसायटीतील अनेक रहिवासी आणि स्थानिक दुकानमालकांनी पथनाट्य उत्सुकतेने पाहिले. 1 मार्च हा सायबर जागरुकता दिवस असल्याने आजूबाजूच्या लोकांना सायबर सुरक्षेबद्दल शिक्षित करण्यासाठी देखील या कार्यक्रमाचा उपयोग करण्यात आला.
2 मार्च 2023 रोजी मुख्य कार्यालयाने सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वसंरक्षण तंत्रासाठी वेबिनार आयोजित केले.
3 मार्च रोजी मानसिक आरोग्याबाबत
जागरुकतेसाठी सत्र आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि कार्य जीवन संतुलन साधण्यासाठी विविध टिप्स देण्यात आल्या.
४ मार्च रोजी महिला कर्मचाऱ्यांनी नवी मुंबई झोन येथे सर्व महिलांसाठी झुंबा सत्राचे वाशी नवी मुंबई हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. झुंबा सत्रात सर्व विभागीय कार्यालयीन कर्मचारी, शाखाप्रमुख, शाळेचे कर्मचारी आणि वाशी सेक्टर 1 ते 3 परिसरातील महिला रहिवासी सहभागी झाले होते. त्या मध्ये सध्या ची झी मराठी ची आघाडी ची मालिका तु चाल पुढ ची सहकलाकार रेवती आढाव यांनी पण सहभाग घेतला होता.
6 मार्च रोजी जॉय ऑफ गिव्हिंगची संकल्पना अंतर्गत
सर्व विभागीय कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाला भेट दिली आणि कोविड वॉरियर्स, डॉक्टर्स आणि नर्सेसचे आभार मानले आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून त्यांना छोट्या भेटवस्तू देण्यात आल्या. त्यांनी बँकेच्या उपक्रमाचे
कौतुक केले.
८ मार्च रोजी वाशी परिसरात वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते, त्यास सहायक पोलिस निरीक्षक प्रियांका खरटमल यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली त्यांनी समानता आणि आदराचे महत्त्व सांगितले. वॉकथॉनमध्ये कर्मचारी व सेक्टर 2/3 चे रहिवासी नागरिक सहभागी झाले होते. वॉकथॉनच्या शेवटी महाव्यवस्थापक अपर्णा जोगळेकर यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात नमूद केले की, बँकेने महिला सक्षमीकरणासाठी शक्य ती सर्व पावले उचलली आहेत आणि हा दिवस एका दिवसापुरता मर्यादित न राहता प्रत्येक दिवशी महिलांचा सन्मान व्हायला हवा.
आंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताह 2023 साठी आयोजित कार्यक्रमांचा कळस म्हणून, सांस्कृतिक संध्या आयोजित करण्यात आली ज्यामध्ये कर्मचार्यांनी त्यांची प्रतिभा दाखवली आणि विविध परफॉर्मन्स केला
0 Comments