Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर संपन्न

मंगरूळपीर :- दिनांक 09/02/2023 रोजी ग्रामीण रुग्णालय मंगरुळपिर यथे जागरूक पालक व सुदृढ बालक मोहिमेची सुरुवात करनाच्या उद्देशाने भव्य मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा च्या उद्घाटनासाठी दादा हयात कलंदर दर्गाचे शमशौद्दीन जहागीरदार व बिरबलनाथ महाराज संस्थेचे अध्यक्ष रामकुमार रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या भव्य रक्तदाना निमित्त 40 लोकांनी रक्तदान केले. 
यामध्ये मंगरुळपिर च्या  सिंघम सहायक पोलीस निरीक्षक मंजुषा मोरे
 तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद भगत वैकिय अधीक्षक  यानी स्वतः रक्तदान करून मोहिमेची सुरुवात केली. तसेच ग्रामीण रुग्णालय चे 20 कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून समाजाचे ऋण फेडले. कोरोना महामारीच्या काळात याच कर्मचाऱ्यांनी जीवाची परवा न करता कार्य केले तसेच या मोफत आरोग्य तपासणी मध्ये 220 रुग्णांनी लाभ घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व अधिकारी व कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते व बचत गटाच्या महीलेनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments