साधा चाळीस किलोमीटर चा रस्ता पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला १० वर्ष लागत आहेत आणि दुसरीकडे रोड मंत्री गडकरी साहेब मात्र एका दिवसात आम्ही जास्तीत जास्त रस्ते तयार करण्याचा विक्रम करीत असल्याचे सांगत आहेत. आकोट अकोला हा रस्ता मात्र अजूनही दहा वर्षे होत आहे तरी पूर्ण होऊन राहिलेला नाही जो भी रस्ता होत आहे त्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून त्यामध्ये कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार होत आहे . माती मिस्त्रीत रेती, पाण्याचे प्रमाण कमी , निकृष्ट काम ,अतिशय अतिशय नीउत्कृष्टपणे संबंधित रस्त्याचे काम होत असले तरी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, इंजिनीयर ,ठेकेदार, जनप्रतिनिधी मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्या कामांमध्ये संबंधित लोकांनी टक्केवारी खाऊन मुके झाल्याचे जनतेमध्ये जन चर्चा आहे. त्यावर एक कारण म्हणजे हा रस्ता पूर्ण झालेला नाही आणि काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे होत असले तरी या रस्त्यावर मात्र टोल नाका लावण्याचे काम मात्र युद्धपातळीवर चालू झालेले आहे. रस्त्याचे काम करीत असताना त्या कामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे गरजेचे असते परंतु ते फलक सुद्धा लावलेले नाहीत तसेच या रस्त्याने जात असताना जे काही फाटे, गाव लागतात त्या गावाच्या सुद्धा नावाचे नामफलक लावलेले नसल्यामुळे अनेक लोकांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. तसेच या कामाबाबतचे फलक सुद्धा लावलेले नसल्यामुळे हे काम किती रुपयाचे आहे कोणत्या ठेकेदार घेतले किती दिवसात पूर्ण करावे लागते हे नागरिकांना कळत नसल्यामुळे संबंधित यंत्रणा ठेकेदार या गोष्टीचा फायदा घेत आहे शासनाने अशा पद्धतीचे फलक लावण्याचा अध्यादेश काढलेला असताना सुद्धा शासनाच्या या अध्यादेशाची पायमल्ली सुद्धा संबंधित विभागाचे अधिकारी पदाधिकारी व ठेकेदार करीत आहे.एक घंट्याचा रस्त्याचा प्रवास मात्र वाहनांना दोन तीन घंटे या रस्त्याने आकोट अकोला रस्ता मार्गस्थ करायला लागत आहे. तरी वरील भ्रष्टाचाराची व निष्कृष्ट कामाची चौकशी त्वरित करून संबंधित ठेकेदारावर ,इंजिनियर , कार्यकारी अभियंतांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच पोलीस स्टेशनमध्ये कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कारवाई न झाल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा निर्भय बनो जन आंदोलनाच्या वतीने समाजसेवक तथा संयोजक गजानन हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिला आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments