वाशिम = राज्यभरात सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांच्या वतीने ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान ७२ तासाचे धान्य वितरण बंद आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात स्वस्त धान्य दुकानदारांनी ६ फेब्रुवारी रोजी जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार असोशिए ऑल इंडियन फेडरेशनचे जेष्ठ उपाध्यक्ष राजु अबुसकर यांच्या नेतृत्वात जिल्हा पुरठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .
जिल्ह्यामध्ये रास्तभाव दुकानदारांना सन २०१७ पासून ई पॉश मशीन देण्यात आलेल्या आहेत. रास्तभाव दुकानदार सन २०१७ पासून ई -पॉश मशीनवरच वाटप करीत आहेत.
त्यामुळे वाटप करतांना रास्तभाव दुकानदारांना भरपूर अडचणी निर्माण होत आहेत. ह्या सर्व मशीन बदलून नविन चांगल्या कंपणीच्या ५ जी नेटवर्क मशीन देण्यात याव्या. जेणेकरून वाटप करतांना कोणतीही अडचण येणार नाही व वितरण व्यवस्था सुलभ व सोईचे होईल माहे डिसेंबर २०२२ पर्यंत वितरीत केले आहे. सप्टेंबर २०२२ ते माहे डिसेंबर २०२२ पर्यंतचे कमिशन रास्तभाव दुकानदारांना अद्याप मिळालेले नाहीत. सदर कमिशन त्वरीत देण्या संबंधी आदेश पारित करण्यात यावेत. जिल्ह्यामधील रास्तभाव दुकानदारांना माहे जानेवारी २०२३ पासून धान्य मोफत वाटण्यात येत आहे. त्याबाबत मिळणारे कमिशनबाबत कोणत्याच
आलेली नाही, तरी दर महिण्यामध्ये वाटप झाल्यानंतर रास्तभाव दुकानरांचे कमिशन १ ते ५ तारखेपर्यंत रास्तभाव दुकानदाराच्या खात्यामध्ये जमा होणे जरूरी आहे. त्याबाबत आदेश पारित करावेत. रास्तभाव दुकानदारांच्या प्रमुख मागण्या - प्रधानमंत्री गरिब कल्याण योजणा हि नेहमीसाठी नियमीत चालू ठेवण्यात यावी, जेणेकरून गोर गरिबकार्ड धारकांना मोठा थिर दिल्या जाईल. देशभरातील २ लाख ७२ हजार रास्तभाव दुकानदार परवाना धारकांची परवाणे बंद करून महिला बचत गटांना सदर दुकाने देण्याबाबत केंद्र सरकारने घाट घातलेला आहे तो आदेश रद्द करण्यात यावा अथवा देशभरातील रास्तभाव
देण्याबाबत आदेश पारित करावेत. वाशिम जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदार यांना गहू, तांदूळ व साखर प्रति क्विटल १ कि.लो. घट शासन मान्यता देण्याबाबत सुद्धा आदेश करण्यात यावेत. वाशिम जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांना धान्य गहू व तांदूळ हे जुटच्या बारदान्यामध्ये (बोंद्रीमध्ये) सदर धान्य देण्याबाबत आदेश करण्यात यावेत. व प्लास्टीक बारदाना पुर्नतः बंद करण्यात यावा वाशिम जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांनी कोरोनाच्या काळामध्ये धान्य वाटप करतांना त्यांना कोरोना झाल्यामुळे जिल्ह्यातील बरेच दुकानदार मरण पावले आहेत. अशा दुकानदारांच्या वारसांना ५० लाखांचा विमा देण्यात यावा. वाशिम जिल्ह्यातील शहरीभागामध्ये मोठ्या प्रमाणात कार्ड धारक राहतात त्यांच्याकडे पूर्वीपासून केशरी कार्ड आहेत त्यांना सुध्दा अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट: करण्याबाबत आदेश पारित करावेत. तसेच केशरीकार्ड धारकांना सुध्दा गहू व तांदूळ मोफत देण्याबाबत सुध्दा आदेश करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनावर स्वस्त धान्य पुरवठा जिल्हाध्यक्ष तानाजी काळे, वाशिम तालुकाध्यक्ष प्रेमभाऊ सोमानी, मंगरुळपीर गजानन राऊत
कारंजा, मानोरा, रिसोड, मालेगाव इत्यादींच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले.
0 Comments