गेल्या अनेक दिवसापासून अतिवृष्टीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात महसूल विभागाने जमा केलेली नाही यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.यावर्षी शेतकऱ्यांनी पीक विमा भरला मात्र नुकसानीची तक्रार करूनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई दिलेली नाही.राज्य शासनाने नियमित कर्जदार शेतकर्यांना पन्नास हजार प्रोत्साहन म्हणून जाहीर केले मात्र शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित आहे.या सर्व मागण्यासाठी शेलुबाजार परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी दि.6 फेब्रुवारीला शेलुबाजार चौकात चक्काजाम आंदोलन करून प्रशासणाचे लक्ष वेधले.पीक विमा भरूनही आज लाखो शेतकरी पीक विमा मिळण्यापासून वंचित आहेत.अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे होऊनही अद्याप पर्यंत त्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही.शासनाकडून काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत प्राप्त झाली तर काही शेतकरी आजही अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर आहेत.अतिवृष्टी आणि पीक विम्यापासून वंचित असल्याने शेतकऱ्याच्या खात्यात येत्या १५ दिवसात शासनाने त्वरित रक्कम जमा करावी.अन्यथा पंधरा दिवसानंतर शेकडो शेतकऱ्यांना घेऊन चक्का जाम आंदोलन करू असा इशारा प्रशासणाला अर्जुन भीमराव सुर्वे यांनी दिला होता.
एआयसी या विमा कंपनीने वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. शेतकऱ्यांनी प्रीमियमची रक्कम भरूनही प्रीमियमच्या तुलनेत कंपनीने शेतकऱ्यांक्या खात्यात कमी रक्कम जमा केली.तर दुसऱ्या बाजूला अनेक शेतकरी नुकसान भरपाईस पात्र असूनही कंपनीने त्यांच्या खात्यात एक रूपयाही जमा केलेला नाही.याचसाठी कंपनी आणि राज्य सरकारच्या विरोधात आज चक्काजाम करण्यात आला.यावेळी शेलुबाजार परिसरातील पाचशेच्या जवळपास पीकविमा भरलेल्या शेतकऱ्याच्या तक्रारीच्या पावत्या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे देण्यात आल्या.कोरोनाच्या काळात संपूर्ण देश ठप्प झाला असताना त्यावेळी देशाला जगवण्याचे काम शेतकरी राजाने केले.आज मात्र तोचं शेतकरी आपल्या हक्कापासून वंचित आहे.या सर्व गोष्टीला शासन आणि प्रशासन जबाबदार आहे.नायब तहसीलदार मंगरुळपिर यांच्या आश्र्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी मधुकर डोके,सुनील राऊत,मारोती खुले,देविदास जाधव,रामराव वाघमारे,दिलीप राऊत,रामा लांभाडे,गोवर्धन पाटील,अशोक हांडे सर,चंद्रशेखर जयभाय,गोपाल राऊत,प्रताप जायभाय,श्याम बोथे,नंदू येवले,गौरव येवले ,ओम येवले, सार्थक येवले,सौरव येवले,प्रज्वल येवले , प्रफुल येवले,माणिक सुर्वे,गजानन सुर्वे,गोपाल सुर्वे,बालू सुर्वे,हरी सुर्वे,तेजेश सुर्वे,अण्णा खांनझोडे,भूषण सुर्वे, पांडुरंग राऊत,बोला राऊत,दयाराम राऊत(सरपंच पिंपरी) सुभाष राऊत,गजानन सुर्वे (सरपंच लाठी) व शिवसेना,युवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
येत्या आठ दिवसांत प्रशासनाने जर मंग्रुळपिर तालुक्यातील शेतकऱ्याच्या खात्यात अतिवृष्टीची रक्कम जमा केली नाही तर आठ दिवसानंतर उपविभागीय अधिकारी मंगरूळपीर यांच्या दालनात जाऊन आत्मदहन करू असा इशारा अर्जुन भीमराव सुर्वे यांनी दिला.(शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे.
0 Comments