शिवसैनिक मित्रांनो तुमच्याशी संवाद साधताना एक वेगळाच अनुभव येत असतो! खर म्हणजे तुमच्या सोबत खुप बोलाव लिहाव अस नेहमी वाटत! पण हल्ली जरा कौटुंबिक जबाबदारी, कामाचा ताण,वेळेचा अभाव या ब-याच गोष्टी.....वैगरे वैगरे... पण तरीही काही गोष्टी व काही विषय महत्त्वाची वाटल्यामुळे आपल्याशी संवाद साधन गरजेचा वाटल
27 जानेवारीला दैनिक सामना मधून वाशिम जिल्ह्याच्या काही नियुक्त जाहीर करण्यात आल्या त्यामध्ये वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदी डॉक्टर सुधीर भाऊ कव्हर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आज घटनेला नियुक्तीला जवळजवळ आठ दिवस पूर्ण झालेले आहे पण तरी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले नाही अभिनंदन केले नाही किंवा त्यांना शुभेच्छा दिल्या नाही असं का आजपर्यंत असं कधीही घडलेलं नाही निदान आपल्या वाशिम जिल्ह्यात तरी नाही आजपर्यंत वाशिम जिल्ह्यात जेवढे नियुक्ती झाल्या असतील त्या सर्व नियुक्त्यांच जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांनी स्वागत करून त्या नवनिर्मित पदाधिकाऱ्यांच अभिनंदन व शुभेच्छा दिल्या व त्या नियुक्तीचं स्वागत करून स्वीकार करून त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे पक्षाने केलेली नियुक्ती पक्षप्रमुखाचा आदेश आजपर्यंत वाशिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी निष्ठेने व प्रामाणिकपणे पाळला आहे कुणीही मातोश्रीचा आदेश किंवा शिवसेना भवनवरून झालेली नियुक्ती याला विरोध केलेला नाही डॉक्टर पंजाबराव झनक यांच्यानंतर डॉक्टर सुधीर भाऊ कव्हर यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी झालेली निवड सर्वांनी स्वीकारली या निवडीला स्वर्गीय डॉक्टर पंजाबराव झनक यांनी सुद्धा विरोध केला नाही तसेच कुठलीही निषेध बैठक व्हा मुंबई वारी केली नाही त्यानंतर सुधीर भाऊ सोबत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी शिवसेना वाढण्यासाठी व शिवसेना घराघरात पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले सुधीर भाऊ यांनी राजीनामा दिल्यानंतर राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली यांचा सुद्धा वाशिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सहर्ष स्वीकारून स्वागत करू अभिनंदन व शुभेच्छा देऊन स्वीकारले तसेच त्यांचे नेतृत्वाला सुद्धा आनंदाने व मनाने सहर्ष करून त्यांचे नेतृत्वात सुद्धा पूर्ण जोमाने काम केले त्यावेळी सुद्धा डॉक्टर सुधीर भाऊ कव्हर यांनी कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही किंवा निषेध केले नाही किंवा त्यावर बैठक घेऊन विरोध केला नाही किंवा मुंबई वारी करून पक्ष नेतृत्वाच्या आदेशाला आव्हान देण्याचा धाडस केलं नाही राजेश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील पदाधिक्रियांनी पूर्ण सहकार्याने काम केले शिवसैनिक सुद्धा त्यांच्यासोबत राहिले त्यानंतर मात्र पक्षांनी राजेश पाटील यांच्या जागी सुरेश भाऊ मापारी यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली तिने ती सुद्धा राजेश पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी सहर्ष स्वीकारली तिचे स्वागत केले अभिनंदन केले व त्या नवनियुक्त जिल्हाप्रमुखाला शुभेच्छा सुद्धा दिल्या व त्यांचे नेतृत्वामध्ये प्रामाणिकपणे काम केले त्यावेळी सुद्धा राजेश पाटील यांनी त्यांच्या जागी नव्याने नियुक्त केलेल्या सुरेश भाऊ मापरी यांना विरोध केला नाही किंवा निषेध केला नाही किंवा मातोश्री व शिवसेना भवनाचा आलेला आदेश झुंगारला नाही बैठका वगैरे घेऊन निषेध केला नाही किंवा आपलं पद टिकवण्यासाठी मुंबई वारी केली नाही मातोश्री व शिवसेना भवनाच्या पायथ्याशी ठाण मांडलं नाही एवढेच काय जिल्ह्यातील इतर उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख आणखी काही पद जे हे मातोश्री व शिवसेना भवन यांनी दिलेले आदेश व ज्याच्या नियुक्ती केल्या ज्यांना पद दिली त्या सर्वांचं आजपर्यंत शिवसैनिकांनी स्वागतच केलं त्यांना शुभेच्छा दिल्या अभिनंदन करून त्यांचे नेतृत्वामध्ये प्रामाणिकपणे कामच केले कुणीही त्यां नियुक्तीला विरोध केला नाही एवढंच काय शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षांमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ व श्रेष्ठ शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत असलेले अनिल पाटील राऊत यांना तालुकाप्रमुख पदावरून काढून अतिशय नवखे असलेले या अगोदर पक्षात कुठलीही पद न उपभोगलेले किंवा कुठलेही पदावर काम न केलेले रामदास पाटील सुर्वे यांना तालुकाप्रमुख केल्यानंतर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी तसेच पक्षात त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ व श्रेष्ठ असलेल्या सर्वांनी त्यांच्या नियुक्तीचं स्वागतच केलं कामे ही केलं आणि करत आहे कुणीही त्यांच्या नियुक्तीला विरोध केला नाही खुद्द अनिल पाटील राऊत यांनी सुद्धा त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांना भावी कार्याच्या शुभेच्छा दिल्या मग आजच या नियुक्तीला पदाधिकारी विरोध का करत आहे हा सर्वसामान्य शिवसैनिकांना पडलेला एक गंभीर प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधणे फार कठीण आहे पण कालांतराने या प्रश्नाचे उत्तरही शिवसैनिकांना निश्चित मिळेल पण तोपर्यंत उशीर झालेला कारण काहीही असो पण सबंधित नियुक्तीला झालेला व त्यानिमित्ताने जिल्ह्यामध्ये झालेली बैठक व प्रमुख पदाधिकारी यांनी केलेली मुंबई वारी यातून वाशिम जिल्ह्यामध्ये शिवसेनेत मोठी दुफळी निर्माण झाली असून दोन गट पडल्याचे उघड झाले आहे आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून शिवसैनिक गोंधळून गेलाय त्यांना काय करावे हे समजेनासे झाले आहे वाशिम मध्ये निषेध व विरोध बैठक आयोजित केल्यानंतर मुंबईला गेलेल्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भेटीची वेळ दिली नाही त्याचबरोबर शिवसेनेचे प्रमुख नेते अरविंद जी सावंत विनायकराव राऊत संजय राऊत अनिल देसाई मिलिंद जी नार्वेकर व अनिल परब यापैकी कोणीही भेटण्याची वेळ दिली नाही किंवा भेट दिली नाही यावरून या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी समजून घ्यायला हवं होतं किंवा लक्षात यायला पाहिजे होतं की ही वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदी डॉक्टर सुधीर भाऊ कवर यांची झालेली नियुक्ती ही ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने झालेली आहे तसेच शिवसेनेचे मार्गदर्शक मंडळ आहे. त्यांच्या विचारांती व वाशिम जिल्ह्याच्या परिस्थितीचा विचार करून अभ्यास करून ही नियुक्ती झालेली आहे व ती शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मधून प्रसिद्ध झाली असल्याने शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे ते संबंधित नियुक्तीच नियुक्तपत्र असतं हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं पण आपण सदर नियुक्तीला विरोध करत आहात म्हणजे नेमकं काय करत आहात निषेध बैठक घेणारे नियुक्तीला विरोध करणारे व मुंबई वारी करणारे स्वतःला मातोश्रीची निष्ठावंत समजतात, शिवसेना भवन हे आमचं पंढरपूर आहे. व वदनिय बाळासाहेब हे आमचे पांडुरंग आहे नव्हे उद्धव साहेबांना सुद्धा पांडुरंगाची उपमा देतात आमची निष्ठा मातोश्री आमची निष्ठा शिवसेना भवनाची आमची निष्ठा ठाकरे परिवाराशी आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव साहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे मोठ्या अभिमानाने सांगता मग आज त्याच मातोश्रीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेली नियुक्ती व दिलेला आदेश याचा पालन न करता त्याचा विरोध करणे हीच निष्ठा काय यालाच यालाच निष्ठावंत शिवसैनिक म्हणायचं काय एक नियुक्ती आपण करू शकत नाही त्यांच्या आदेशाचा पालन करू शकत नाही मग आपण कुठल्या तोंडाने निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे मिरवता हा अधिकार आपल्याला आहे का हा प्रश्न आपण स्वतः स्वतःला विचारला तर चांगलं होईल व सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहज मिळतील आणि तसेही गेली 1994 पासून 28 वर्षे झाले शिवसेनेत काम करत असताना आजपर्यंत शिवसेनेचे नियुक्ती या मातोश्रीवरून होत आलेले आहे व त्याची प्रसिद्धी व नियुक्तीपत्र हे दैनिक सामना मधून प्रसिद्ध करून सर्वांना कळविण्यात आलेले आहे व शिवसेनेच्या इतिहासामध्ये एक वेळ मातोश्रीवरून झालेली नियुक्ती व निघालेला आदेश कायम राहिलेला आहे त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा कुणाच्याही विरोधानंतर त्यामध्ये बदल झालेला नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणून काही अपवाद वगळता झालेली नियुक्ती ही रद्द झालेली नाही व ती होण्याची शक्यता देखील फार कमी आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी पक्ष अतिशय बिकट परिस्थितीतून जात असताना व पक्षाचा कठीण काळ सुरू असताना पक्षाला अधिक संकटात न टाकता व पक्ष नेतृत्वाला आवाहन न देता पक्ष नेतृत्वाच्या आदेश न जुगारता त्याला विरोध न करता पक्षाच्या पक्षप्रमुखाच्या पक्ष आदेशाच्या व पक्षाच्या सल्लागार मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून केलेल्या नियुक्तीचे स्वागत करून दिलेले आदेशाचं प्रामाणिकपणे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पालन करावे व वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेला गौतम वैभव प्राप्त करून देण्याकरिता पक्षप्रमुख यांनी वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्त केलेल्या डॉक्टर सुधीर भाऊ कवर यांना सहकार्य करून त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणांनी पूर्ण ताकतीने व जोशाने कामाला लागावा व स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या जयंतीदिनी त्यांना त्यांना विनम्र अभिवादन करू शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना साथ देऊन त्यांच्या हात बळकट करावे तर आणि तरच वाशिम जिल्ह्यात शिवसेनेला गत वैभव प्राप्त तर होईलच शिवाय शिवसेने मधली दुफळी सुद्धा मिटेल व सर्व शिवसैनिक एक दिलाने काम केल्यास शिवसेना मजबूत पणे या जिल्ह्यांमध्ये उभे राहिल मी या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांच्या निष्ठावंत शिवसैनिकांना हात जोडून नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी मातोश्री होऊन आलेल्या आदेश व नियुक्ती याचा स्वागत करावं त्यांचा अभिनंदन व करून शुभेच्छा द्याव्या तसेच ज्येष्ठांनी त्यांच्या सहकारी म्हणून लहानांनी त्यांचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्यासोबत शिवसेनाप्रमुखांची शिवसैनिक म्हणून शिवसेना वाढीसाठी व शिवसेनेसाठी काम करावं एवढीच मी या आपणास कळकळीची विनंती करतो व एक आपला सहकारी म्हणून आपल्याला आवाहन करतो जे काही मतभेद असतील ते मतभेद बाजूला ठेवा काही विचार पटत नसतील ते विचार खाजगी मध्ये सांगा असं जाहीरपणे कुठलंही वाचता न करता व संकटकाळी पक्षाला अडचणीत न आणता पक्षाला सहकार्य करा एवढीच या क्षणी मी आपणास पुनश्च एकदा हात जोडून नम्रपणे कळकळीची विनंती करतो व आपली रजा घेतो हा इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोपर्यंत जय महाराष्ट्र आपला नम हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक
अण्णाभाऊ गोवर्धन चौधरी रा. चेहेल पोस्ट तालुका मंगरूळनाथ जिल्हा वाशिम भ्रमणध्वनी
क्रमांक 99 २२ ०१ ०४ ६०
0 Comments