पो.स्टे.वाशिम शहर येथे दाखल अप.क्र.६२५/२२, कलम ३९२, ३४ भादंवि मध्ये सहभाग निष्पन्न झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोर, मध्य प्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीच्या साथीदारास संघपाल यास यापूर्वीच मुंबई येथून अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
सदर आरोपींनी पो.स्टे.वाशिम शहर हद्दीतील मन्नासिंह चौक, पो.स्टे.वाशिम ग्रामीण हद्दीतील सुंदर वाटिका व मालेगाव येथे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याच्या चेन हिसकावत पळ काढला. सदर गुन्ह्यामध्ये पो.स्टे.वाशिम शहर व पो.स्टे.जऊळका हद्दीतील चोरीच्या मोटारसायकलींचा वापर केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. मागील महिन्यातच चेन स्नॅचींग प्रकरणातील आरोपी नामे संघपाल भारत कांबळे यास मुंबई येथून अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणातील त्याचे इतर साथीदार यांचा शोध घेणे सुरु होते. संघपाल याचा साथीदार गोलू उर्फ दीपक सुनील खिल्लारे हा इंदोर, मध्यप्रदेश येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेत त्यास इंदोर येथून ताब्यात घेतले व पुढील तपासकामी पो.स्टे.वाशिम शहर यांच्या ताब्यात दिले आहे. नागरिकांनी अश्या प्रकारचे गैरव्यवहार व संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
सदर कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, पोहवा.सुनील पवार नापोकॉ.प्रशांत राजगुरू, नापोकॉ.राजेश राठोड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, पोकॉ.गोपाल चौधरी, नेमणूक सायबर सेल, वाशिम यांच्या तांत्रिक सहाय्याने पार पाडली.
(जनसंपर्क अधिकारी)
पोलीस अधिक्षक, वाशिम करिता.
0 Comments