Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळनाथ तालुका शिव सेनेची आढावा बैठक संपन्न!! शिव सेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सुधीर भाऊ कव्हर याची उपस्थिती!!

 
  सुधीर भाऊ कव्हर याची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला!    
  मंगरूळपीर दि. 4(ता.प्र) तालुक्याची आढावा बैठक शिव सेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सुधीर भाऊ कव्हर याचे अध्यक्षतेखाली स्थानिक विश्राम गृहात पार पडली. यावेळी गजानन देशमुख,रवी पाटील राऊत,सुरेश कदम,याची प्रमुख उपस्थिती होती.                                 
वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदी पक्ष प्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांनी माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हाप्रमुख तसेच विद्यमान जि.प. सदस्य डॉ.सुधीर भाऊ कव्हर याची नव्याने नियुक्ती केलीआहे. जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर  नेहमीप्रमाणे व आपल्या कार्यशैलीत झपाटल्या प्रमाणे सुधीर भाऊ कव्हर यांनी बैठकीचा सपाटा सुरू केला असून त्याच अनुशंगाने आज शनिवारला स्थानिक विश्राम गृह येथे शिव सेनेची आढावा बैठक संपन्न झाली.                                            
यावेळी सुधीर भाऊ कव्हर यांनी त्याची जिल्हाप्रमुख पदी निवडीची पार्श्वभूमी, झालेली नियुक्ती, पक्ष प्रमुखाचे आदेश,व पुढील कार्य व कामाची आखणी व दिशा तसेच पध्दत याबद्दल उपस्थित शिव सैनिकाना मार्गदर्शन केले.तसेच माझी जिल्हाप्रमुख पदी पक्ष प्रमुख उध्दव साहेब यांनी नियुक्ती करून जो विश्वास दाखवला तो मी सार्थ ठरवेल त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.तसेच माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी अतिशय प्रामाणिक व चोक पणे पार पाडेल,जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिव सैनिकाना सोबत घेऊन काम करेल असा विश्वास उपस्थित शिव सैनिकाना दिला.पक्ष संकटात व अडचणीत असताना पक्षाला आमदार व खासदार सोडून जात असताना माझी जिल्हाप्रमुख पदी झालेली निवड ही एक आव्हान आहे, आणी हे आव्हान मी स्विकारल असून आपण सर्वानी पक्ष प्रमुख याचे हात बळकट करण्यासाठी,पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच पुन्हा एकदा महाराष्ट्रात पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी आपल्याला एकदिलाने व एकजुटीने काम करून पक्ष विस्तार,वाढ,व गाव तिथे शाखा, व हर घर शिव सैनिक या प्रमाणे काम करायचे आहे.व पक्ष प्रमुख उध्दव साहेब याचे हात बळकट करून त्यांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंञीपदी बसवायचे आहे,असे यावेळी जिल्हाप्रमुख सुधीर भाऊ कव्हर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.माझी झालेली नियुक्ती ही मला ही माहीत नाही.मला माझ्या मिञानी सांगितली तसेच ऑनलाईन दैनिक सामना वर्तमान पत्राची प्रत काढून खाञी केली व त्यानंतर पक्ष प्रमुख, खासदार अरविंद सावंत साहेब तसेच ईतर वरिष्ठ पदाधिकारी याचेशी बोलून खाञी करून त्यांना धन्यवाद दिले. मी पक्षांकडे कुठलीही लाबीग केली नाही. पक्ष प्रमुखांनी जिल्ह्यातील वर्तमान परिस्थितीचा आढावा घेऊन नियुक्ती केली असून कुणीही नाराज होऊ नये, तसेच माझी सुध्दा कोणावरही नाराजी नाही, हिंदु ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब याचे विचारांशी बांधील असलेला तसेच पक्ष प्रमुख उध्दव साहेब याचेवर प्रेम व निष्ठा ठेवणारा व त्याचे नेतृत्व मान्य करून काम करणारा प्रत्येक शिव सैनिक व व्यक्ती माझा आहे, मी कोणालाही माझा विरोधक मानत नाही.सर्वाना सोबत घेऊन चालण्याचे काम मी करणार आहे.व आपण सुध्दा सर्व मतभेद विसरून व काम कराव,असे आवाहन केले तसेच यापुढे दर महिन्याला आढावा बैठक घेण्यात येईल, तसेच जिल्ह्यातील सर्व शिव सैनिकाना सदैव उपलब्ध असेल, आपण एक फोन करा मी धाऊन येईल आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असे आश्वासन सुध्दा दिले.तसेच ही फक्त आढावा बैठक असून यात कुठलिही नियुक्ती वा ठराव संमत करण्यासाठी नाही.असे सुध्दा आवर्जून सांगीतले तसेच कुणीही कोणतीही नाराजी न ठेवता सर्वानी मला सहकार्य करून पक्ष प्रमुख उध्दव साहेब याचे आदेशाचे पालन करावे असी विनंती वजा आव्हान केले.                           तालुका आढावा बैठकीला जेष्ठ शिव सैनिक मधुकर डोके,गजानन राऊत,भागवत शिंदे, अण्णाभाऊ चौधरी,सुभाष राऊत, विनोद चौधरी,सुरज बुरे,पकज राऊत,गजानन ढोले,सचिन राऊत,अर्जुन सुर्वे,प्रज्वल येवले,धिरज राऊत,गोपाल सुर्वे,अनिकेत चौधरी,भुषण सुर्वे,दयाराम राऊत,अमोल पाटील,पांडुरंग राऊत,गणेश पाटील,निलेश मिसाळ,गोवर्धन पाटील,दिपक ठाकरे,रमेश निकम,राजेश म्हातारमारे,सचिन राठोड,बळीराम डोके,उमेश पाटील,दत्ता राऊत,बाळकृष्ण चारखोड,गजानन पाटील,यासह तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी व शिव सैनिकाची उपस्थिती होती.                                कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अण्णाभाऊ चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्जुन सुर्वे यांनी केले व बैठकीची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments