वाशिम जिल्ह्यात घातपाताला आळा घालण्यासाठी सन २०११ मध्ये बॉम्ब शोधक व नाशक पथकाची स्थापना करण्यात आली असून सदर पथकामध्ये ०१ अधिकारी, ०५ बॉम्ब टेक्नीशीयन, ०४ श्वान हस्तक, ०२ चालक व ०२ बॉम्ब शोधक श्वान (स्टेफी व प्रिन्स) असे नेमणुकीस आहेत.
वाशिम जिल्ह्यात कोठेही बॉम्ब अथवा संशयित वस्तू आढळल्यास पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी बॉम्ब अथवा स्फोटक निष्क्रिय करण्यासाठी बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी धाव घेऊन सदर बॉम्ब अथवा स्फोटक निष्क्रिय करते. जिल्ह्यातील मर्मस्थळे, वर्दळीची ठिकाणे, बस स्थानके, रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळे यांची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे वेळोवेळी घातपात विरोधी तपासणी केली जाते. तसेच जिल्ह्यात, विभागीय स्थरावर व राज्य स्तरावर होणारे व्हीआयपी व व्हीव्हीआयपी दौऱ्यांचे वेळी सदर कार्यक्रमांची घातपातविरोधी तपासणी बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून केली जाते.
बीडीडीएस पथक वाशिम येथे स्फोटक निष्क्रिय करण्याकरिता मेटल/एक्सप्लोसीव्ह डिटेक्टर, इलेक्ट्रॉनिक कंपोनंटस डिटेक्टर, इंडोस्कोप, रिमोटली ऑपरेटेड टूल कीट, एक्स रे मशीन, सर्च लाईट, बायनाकुलर इत्यादी आवश्यक ती सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध आहे. सदर पथकामध्ये कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी एनएसजी, एनआयए या प्रशिक्षण संस्थांमधून स्फोटके निष्क्रिय करण्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे. बॉम्ब शोधक श्वानांचेसुद्धा प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांना उच्च दर्जाचे खाद्य पुरविले जाते. शासनातर्फे दोन्ही श्वानांचा विमा उतरविला असून पथकामधील अंमलदारांच्या कामाच्या जोखीमीची पातळी पाहता शासनाकडून त्यांना जोखीम भत्ता दिला जातो.
सन २०२२ या वर्षामध्ये बॉम्बशोधक व नाशक पथक, वाशिम यांच्याकडून एकूण ४७ व्हीव्हीआयपी/व्हीआयपी दौरे कार्यक्रम तपासणी, ११९ वेळा बसस्थानके व रेल्वे स्थानके तपासण्या, ३७ मर्म स्थळे, १७० गर्दीच्या ठिकाणी घातपात विरोधी तपासण्या करण्यात आल्या असून वेळोवेळी जिल्ह्यात झालेल्या मॉक ड्रील मध्ये सहभाग घेतला आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून जिल्ह्यात वेळोवेळी महत्वाचे ठिकाणांची कसून घातपातविरोधी तपासणी करण्यात येत असल्याने संशयित वस्तू आढळल्यास अगोदरच निष्क्रिय करण्यात येते व पुढील धोका टाळण्यात येतो. त्यामुळे नागरिकांच्या जीवित्वाचे व मालमत्तेचे रक्षण होऊन लोकांमध्ये सुरक्षेची भावना वाढीस लागते.
मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.प्रवीण सुळे, सपोउपनी.एच.जी.चौधरी, पोहवा.एस.आर.सुपारे, नापोकॉ.डी.एस.पवार, ए.एन.घाटोळे, पोकॉ.जी.व्ही.मुंडे, डी.टी.ढोके, के.बी.मस्के, ए.एन.घाटोळे, एस.बी.अंभोरे, एस.व्ही.वाटाणे, के.पी.डौलसे, जी.डी.भिसे हे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्टेफी व प्रिन्स हे दोन श्वान बॉम्ब शोधक व नाशक पथक वाशिम येथे कामगिरी बजावत आहेत.
0 Comments