मंगरुळपिर दि 3
महिलांनी विविध क्षेत्रात सहभाग वाढविणे गरजेचे असून महिलांना संधी उपलब्ध व्हावी असे आवाहन जिव्हाळा फौंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी अवताडे यांनी दि 3 रोजी केले
महीला सक्षमीकरण हे उद्दिष्ट सामोरे ठेवून अश्विनी अवताडे ह्या गेल्या तीन वर्षापासून भटक्या जमातीतील महिलांना व आदिवासी भागातील महिलांना बालसंगोपन योजनेची माहिती देत आहेत बालविवाह प्रतिबंधक कायदा विषयी गावामध्ये, शाळेमध्ये जनजागृतीचे काम करीत आहेत.शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळावा याकरिता शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करणे, तसेच आरोग्य विषयी मासीक पाळी मध्ये घ्यायची काळजी या विषयावर कार्यशाळा घेणे, महीला व किशोरवयीन मुलींना सनीटरी पॅड ची योग्य विल्हेवाट कशी लावायची या विषयी जनजागृती करण्याचे काम करीत आहेत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम या कायद्याबाबत कार्यशाळा आयजित करणे, महीला मेळाव्याचे आयोजन करून त्यांना बचत गट, रोजगार स्वंरोजगार बाबत मार्गदर्शन करणे, शाळांमध्ये बालहक्क जाणीव जागृती कार्यक्रम घेणे. अशा प्रकारचे विवीध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. या जनजागृतीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये व आदिवासी भागातील महिलांमध्ये विविध विषयाची माहिती झाली त्याच माध्यमातून महिलांनी बचत गट तयार करून काही आपले व्यवसाय चालू केले तसेच काही महिला बाहेर पडून निर्भीडपणे काम करत आहेत या उल्लेखनीय उपक्रमात अनेक महिला मोठया प्रमाणात सहभागी होत आहे
0 Comments