डॉक्टर साहेब ज्या तामसी गावचे रहिवासी आहेत त्या जिल्हा परिषद सर्कलची गेली चार वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेतृत्व करीत आहे त्याचबरोबर ते गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे कार्य प्रामाणिकपणे व अतिशय शिस्तबद्ध तसेच पूर्ण ताकदीने करीत आहे शिवसेनाप्रमुखांचा एक शिस्तबद्ध, आक्रमक,ध्येयवेळा,अभ्यासू,कडवट,कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची संपूर्ण जिल्हाभर खाती आहे त्यांनी या अगोदर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम केले आहे मी त्यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये काम करीत असताना त्यांच्यासारखा अभ्यासू आक्रमक प्रामाणिक जिद्दी व कार्यकर्त्याला सोबत घेऊन कार्यकर्त्याच्या समस्या प्रश्न समजून घेऊ ते सोडवण्यासाठी आक्रमकपणे व तेवढ्याच अभ्यासपूर्ण मुद्देसूद प्रश्न मांडून अधिकारी व कर्मचारी यांचे कडून प्रश्न सोडून घेणे समस्याचे निराकरण करणे व कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम डॉक्टर सुधीर भाऊ कवर यांनी केले आहे सुधीर भाऊ कवर हे जिल्हाप्रमुख असताना अतिशय शिस्तबद्धपणे पक्षाचं काम करत होते दर महिन्याला प्रत्येक तालुक्यामध्ये शिवसेनेची बैठक आयोजित करून शिवसैनिकांना त्यांचे प्रश्न विचारून त्यांची समस्या विचारून त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारा त्याचबरोबर शिवसैनिकांची समाधान होईल शिवसैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी काय काय करता येईल यासाठी बैठका आयोजित करणे त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून दर महिन्याला बैठक आयोजित करून शिवसैनिकांशी संपर्क साधून प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधून प्रत्येक शिवसैनिकांचे शिवसैनिकाची समाधान करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे मी माझ्या आयुष्यातील वाशिम जिल्ह्यातील झालेल्या जिल्हाप्रमुखापैकी एक उत्कृष्ट अभ्यासू आक्रमक प्रामाणिक निष्ठावंत कडवट व कट्टर शिवसैनिक तर होतेच त्याचबरोबर अतिशय चांगला व शिवसेनाप्रमुखांच्या विचाराशी बांधील असलेला त्यांच्या भूमिकेशी एकरूप असलेला त्यांच्या विचारावर चालणारा त्यांच्या विचाराचा वारसा चालविणारा शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेला एक कडवट,लढवय्या शिवसैनिक व जिल्हाप्रमुख डॉक्टर सुधीर भाऊ कव्हर यांच्या रूपाने शिवसेनेला मिळाला होता त्यांच्या काळात शिवसेना वाशिम जिल्ह्यामध्ये रुजली वाढली व आक्रमक सुद्धा झाली त्यामुळे शिवसेना वाशिम जिल्ह्यात गावागावात व घराघरात पोहोचली सुधीर भाऊ यांचे संघटन कौशल्य अतिशय वखाण्याजोगे होते त्यांचा काम करण्याचा आवाका फार मोठा होता हाती घेतलेलं काम पूर्ण झाल्याशिवाय ते शांत बसत नव्हते सतत शिवसैनिकांना न्याय मिळवण्यासाठी ते कार्यरत असायचे शिवसेनेचे प्रश्न समस्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करायचे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची हातोटी होती त्यांच्याकडे लहान मोठा गरीब श्रीमंत आपला परका असा भेदभाव नव्हता त्यांना सर्व एक शिवसैनिक होते डॉक्टर सुधीर भाऊ यांनी मागील काळात ते जिल्हाप्रमुख असताना जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख, शहरप्रमुख,सर्कल प्रमुख,उपसरकल प्रमुख,शाखाप्रमुख तसेच सर्वसामान्य शिवसैनिक या सर्वांना सोबत घेऊन, चालण्याचे काम सुधीर भाऊ यांनी केले माझ्या राजकीय शिवसेनेच्या आयुष्यातील आतापर्यंतच्या सर्व जिल्हाप्रमुखांमध्ये अतिशय उत्कृष्ट व यशस्वी जिल्हाप्रमुख म्हणून ज्यांचा कार्यकाळ या वाशिम जिल्हा मिळाला त्यामध्ये प्रामुख्याने व अतिशय अभिमानाने मी सांगू शकतो की डॉक्टर सुधीर भाऊ कव्हर हे आहेत याचा अर्थ असा नाही की इतर जिल्हाप्रमुख या जिल्ह्याला लाभले त्यांनी शिवसेनेचा कार्य केलं नाही आपापल्या परीने इतर जिल्हाप्रमुख यानी सुद्धा कार्य करण्याचा प्रयत्न केला आपले योगदान देण्याचा प्रयत्न केला पण ज्या प्रमाणात कार्य करायला पाहिजे होती वेळ द्यायला पाहिजे होता पक्ष वाढीसाठी प्रयत्न करायला पाहिजे होती शिवसैनिकांना सोबत घेऊन जायला पाहिजे होती ज्याच्या जी गुणवत्ता आहे योग्यता आहे त्याला त्या जागेवर बसवायला पाहिजे होते तिथे इतर जिल्हाप्रमुख कुठेतरी कमी पडले मी कुणाचे नाव घेणार नाही व कुणावर वैयक्तिकरित्या आरोप करणार नाही वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर नव्यानेच पहिली जिल्हाप्रमुख लाभलेले जिल्हाप्रमुख हे कोणत्या पक्षातून आले होते व ते कसे जिल्हाप्रमुख झाले व त्यांनी कसा कारभार केला व पक्ष वाढीसाठी किती प्रयत्न केले आणि किती पक्ष वाढविला व ते जिल्हा जिल्हाभर तालुक्यात जाऊन काय करत होती प्रत्येक तालुक्याच्या विश्रामगृहावर बसून पक्ष वाढीसाठी किती प्रयत्न करीत होते तसेच इतर काय करत होते या सर्व पाश्र्वभूमीवर त्यांच्या कार्यावर खुश होऊन शिवसेनेतील जुने जाणते निष्ठावंत शिवसैनिक यांनी त्यांच्याविरुद्ध कोणाकोणाकडे किती वेळा कुठे आणि कशा कशा प्रकारे तक्रारी केल्या व त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून काढून टाकण्याकरिता काय काय केले हे सर्व जिल्ह्यातील माझ्यासह सर्व शिवसैनिकांना ज्ञात आहे,माहित आहे मला त्या खोलवर जायचे नाही किंवा कुणाचे नाव घेऊन कुणालाही एक्सपोज करायचे नाही त्या जिल्हाप्रमुखांना पदावरून काढून त्यांची जागी आज ज्या व्यक्तीची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाली आहे,त्याच डॉक्टर सुधीर भाऊ कव्हर यांना बसविण्यासाठी प्रयत्न करणारे ताकद लावणारे हे आज जेव्हा मातोश्रीवरून शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी स्वतः सरळ व प्रत्यक्ष नियुक्ती करून व शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये नियुक्तीची माहीती देऊन डॉक्टर सुधीर भाऊ कवर यांना वाशिम जिल्ह्याच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्त करून आक्रमक अभ्यासू व बाळासाहेबांच्या सच्चा शिवसैनिक जिल्हाप्रमुख म्हणून दिला आहे तेव्हा शिवसेनेचा पक्ष प्रमुख यांचा आदेश म्हणून जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी आदेश म्हणून तो स्वीकारला पाहिजे तसेच डॉक्टर सुधीर भाऊ कवर यांच्या नेतृत्वामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये काम करून पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे व निष्ठावंत पणे काम केले पाहिजे दैनिक सामना मधील 27 जानेवारी ला प्रसिद्ध झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये वाशिम जिल्हा प्रमुख म्हणून डॉक्टर सुधीर भाऊ कव्हर यांची जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांच्या नियुक्तीचे ज्याप्रमाणे स्वागत करायला पाहिजे होते त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा द्यायला पाहिजे होत्या त्या दिसल्या नाही काही मोजके पदाधिकारी व शिवसैनिक सोडले तर फेसबुक व्हाट्सअप वर कुणाची पोस्ट व शुभेच्छाच्या प्रतिक्रिया दिसल्या नाही असं का आपण स्वतःला शिवसेनाप्रमुखांची निष्ठावंत शिव सैनिक म्हणून घेतो व पक्षप्रमुखाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे अतिशय गर्वाने व अभिमानाने सांगतो मग त्याच पक्षप्रमुखाचा आदेश आपण न पाडून कोणती निष्ठा सिद्ध करत आहोत पक्षप्रमुखांचा आदेश न न पाडू त्यांच्या आदेशाचा अपमान व अवहेलना करून आपण कोणती निष्ठा सिद्ध करत आहोत आज वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीवरून असे लक्षात येते की डॉक्टर सुधीर भाऊ कवर यांची जिल्हाप्रमुख पदी झालेली निवड ही बहुतांश पदाधिकारी व शिवसैनिकांना रुजलेली नाही की आवडलेली नाही याची कारण वेगवेगळे असू शकतात कुणाचा स्वार्थ कुणाचा इगो कुणाची मजबुरी कुणाची लाचारी कुणाचे संबंध आडवे आलेले असू शकतात पण या सर्वांच्या वर पक्ष शिवसेनाप्रमुख पक्षप्रमुख व पक्ष हित महत्वाचे व वर आहे हे म्हणूनच सर्वांनी या नियुक्तीचे व आदेशाचे पालन करावे तर आणि तरच आपण शिवसेनाप्रमुखांची निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे व पक्षप्रमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे अभिमानाने सांगण्याचा बोलण्याचा नैतिक अधिकार आहे नाहीतर आपल्याला शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक असल्याचा सांगण्याचा अधिकार आहे का याचा सारांसार विचार सबंधित सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी नक्की करावा आम्ही 1994 पासून शिवसेनेमध्ये शिवसैनिक व विविध पदावर काम करत असताना पूर्वी अकोला जिल्हा असताना माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे श्रीकृष्णाची ढोरे व विजय भाऊ मालोकार श्रीरंग दादा पिंजरकर व त्यानंतर वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर पंजाबराव झनक डॉक्टर सुधीर भाऊ कवर राजेश पाटील व त्यानंतर सुरेश भाऊ मापारी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये हसत खेळत व प्रामाणिकपणाने काम केले आहे पक्षाने वेळोवेळी ज्यांना ज्यांना जिल्हाप्रमुख म्हणून व तालुका प्रमुख म्हणून नियुक्त केले,त्या सर्व नियुक्तीचे स्वागत करून त्यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या परीने जेवढे योगदान देता येईल तेवढे योगदान आम्ही पक्ष वाढीसाठी दिले, तालुका प्रमुख म्हणून राजेश पाटील,भीमराव पाटील, अनिल पाटील यांच्या नेतृत्वात सुद्धा आम्ही काम केले त्याचबरोबर पक्षात नवीन असणारे रामदास पाटील सुर्वे यांच्या नियुक्तीचे सुद्धा स्वागत करून पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणाने व तेवढ्यात जोमाने आक्रमकपणे पक्षात काम करत होतो पण आम्ही कधीही पक्षाने दिलेल्या जिल्हाप्रमुखांच्या विरोधात किंवा तालुकाप्रमुखांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली नाही किंवा त्या जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख विरोध केला नाही पक्षाने दिलेला आदेश शिरसावत मानून व तो आमच्यासाठी अंतिम आदेश मानून आणि त्यांचं स्वागत करून पक्ष वाढीसाठी पक्ष कार्यासाठी व पक्षासाठी काम करीत राहिलो,नात गोत आड येऊ दिल नाही,की पाहल नाही,आता कौटुंबिक कारणास्तव म्हणा काही तात्विक मुद्द्यावर म्हणा किंवा काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत केलेली आघाडी म्हणा आम्हाला पटली नसल्यामुळे आम्ही पक्षापासून थोडं तटस्थ आहोत,पण ना पक्ष सोडला, ना कुण्या पक्षात प्रवेश केला, हा ज्या दिवशी उध्दव साहेब काँग्रेस व राष्ट्रवादी पासून फारकत घेतील त्या दिवशी सक्रिय होण्याचा नक्कीच विचार करू,सर्वांना माझी विनंती आहे की आपण शिवसेनाप्रमुखांचा कळवट कट्टर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून घेत आहात तर पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा व त्यांनी दिलेला आदेश त्यांनी केलेली नियुक्ती यांचा विरोध न करता त्याचं मनापासून स्वागत करून पक्ष हितासाठी पक्ष संकटात असताना पक्षाने दिलेल्या जिल्हाप्रमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी अधिक जोमाने काम करावे, पद मिळणे पद काढणे लोकशाहीमध्ये व पक्षाच्या राजकीय जडणघडणीमध्ये निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे आज जो आजी आहे उद्या माझी होईल जो माझी आहे तो परवा आजी होईल त्याला आज पद आहे उद्या नसेल ज्यांना नसेल त्यांना उद्या मिळेल ही प्रक्रिया पक्षांमध्ये व राजकारणामध्ये चालतच असते त्यामुळे पद गेलं म्हणून नाराज होऊ नये आणि पद मिळालं म्हणून हुरळून जाऊ नये या अगोदरचे जिल्हाप्रमुख आदरणीय सुरेश भाऊ मापारी हे एक साधे भोळे तसेच सरळ स्वभावी व्यक्तिमत्व होते ते निष्क्रिय होते अशातला भाग नाही त्यांनी पक्ष कार्य केलं नाही असेही नाही म्हणूनच पक्षाने त्यांना जिल्हा समन्वयक पदाची महत्त्वाची अशी जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे नाराज होण्याचे कारणच नाही पक्षाने सुरेश भाऊ यांना जिल्हाप्रमुख या पदावरून जिल्हा समन्वयक या पदावर बढती दिलेली आहे त्यांचा प्रमोशनच केलेल आहे व त्यांचा हेतूचित सन्मान केलेला आहे पक्षाने व पक्ष नेतृत्वाने त्यांना कुठेही डावलं किंवा बाजूला केलं असं म्हणता येणार नाही भविष्यात पक्ष त्यांना याहीपेक्षा मोठी जबाबदारी देऊ शकते त्यामुळे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी संयम बाळगायला हवा तसेच हा बदल स्वीकारायला हवा ज्या व्यक्तीची पक्षाने व पक्षप्रमुखांनी वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली तो काय पक्ष बाहेरील नाही उपरा नाही विविध पक्ष फिरून आलेला नाही,जुना शिवसैनिक आहे, निष्ठावंत शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेला शिवसैनिक आहे,आक्रमक शिवसैनिक आहे, कडवट कट्टर शिवसैनिक आहे,आपला आणि आपल्यातला सामान्य शिवसैनिक आहे,म्हणून सर्वांनी त्यांचं मनापासून स्वागत करून त्यांचे नेतृत्वात जिल्हाभर सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी कामाला लागावा अशी माझी आपणा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे,तसे मला कोणाची खोटी स्तुती व कौतुक करणं कुणालाही हरभऱ्याच्या झाडावर चढवणे कधीही जमलं नाही जमत नाही मी ते करणार नाही,माझ्या रक्तात नाही आणि वैयक्तिक कुणाला माझा विरोध कालही नव्हता,आणि आजही नाही यापुढे असणार नाही, हा मुद्द्यावर किंवा तत्व किंवा त्याच्या विचाराशी किंवा मताशी माझा विरोध कालही असेल आजही आहे यापुढे राहील यात शंका नाही, हा खोट्याला ला खोटं,खऱ्याला खरं,चांगल्याला चांगलं, वाईट ला वाईट हे म्हणणं ही माझी जुनी सवय आहे आणि ती जाईल असं मला वाटत नाही, माझा पोटात एक आणि ओठावर एक असं नाही, जे पोटात आहे ते ओठावर आणून स्पष्टपणे बोलून द्यायचं मग कोणाला आवडू न आवडू लिहिण्यासारखं भरपूर आहे. जेवढं लिहिलं तेवढं थोडंच आहे पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात कुठेतरी थांबावं लागतं मी आपल्याला मार्गदर्शन करावे एवढा ज्ञानी नक्कीच नाही सूचना देणे एवढा मोठाही नाही हा मी आपल्याला विनंती मात्र नक्कीच करू शकतो तेवढा हक्क अधिकार मला नक्कीच आहे आणि एक गोष्ट मात्र मला आवर्जून सांगायची वाटते की मी या निमित्ताने कोणाचाही वैयक्तिक विरोध करत नाही किंवा कोणाचंही समर्थन करून किंवा कोणालाही पाठिंबा देऊन कोणालाही खुश करण्याचा माझा कोणताही प्रयत्न माझी कोणतीही इच्छा नाही मला पक्षाकडून आता कोणतेही पद नको आहे किंवा कुठलीही आशा अपेक्षा नाही .
हा लेख मी वाशिम जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी व शिवसेनाप्रमुख व पक्षप्रमुख प्रेम करणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांसाठी लिहिला आहे बरेच पदाधिकारी आहेत की जे या अगोदर डॉक्टर सुधीरभाऊ कवर यांची नियुक्ती होण्याअगोदर अशी म्हणत होते खाजगीत बोलताना की डॉक्टर सुधीर भाऊ कवर यांच्यासारखा जिल्हाप्रमुख असायला हवा आणि त्यांना जिल्हाप्रमुख म्हणून पक्षाने नियुक्त कराव पण आज काय कुणाला ठाऊक सुधीर भाऊ यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर ते मुंग गिळून बसलेले आहेत किंवा नाराजी दाखवत आहे याचं कारण मला अजून समजलेले नाही त्यांची काय मजुरी आहे किंवा त्यांच्यावर काय कुणाचा दबाव आहे किंवा ती कोणत्या मतलब व लालचिनी किंवा आणखीन काही कारणाने विरोध करत आहेत असो लेख खूप लांबलेला आहे आणि लिहिण्यासारखं मी सांगितलं की भरपूर आहे माझ्याजवळ लिहिण्याला खूप काही आहे परंतु वेळ मर्यादा याचा भान ठेवून मी इथं थांबतो असो पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या शेवटी आपली मर्जी आणि हो हा लेख मी एक शिवसैनिक म्हणून नाही तर पत्रकार म्हणून ते दिसलं पटलं वाटलं ते लिहिण्याचा व आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे असं समजून तू घ्यायचा सोडायचा काय करायचं तो निर्णय आपला आहे असो इथेच आपली रजा घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आपला शुभचिंतक-
राहणार- चेहेल
पो. ता. मंगरूळनाथ
जिल्हा वाशिम
मो. क्र. ९९२२०१०४६०
0 Comments