चौकीदाराच्या जागरूकतेमुळे व पोलीसांच्या कार्यतप्तरतेमुळे पो.स्टे.वाशिम शहर हद्दीतील सुभाष चौक परिसरात असलेल्या सराफा लाईन मधील ATM फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या ०२ चोरट्यांना रंगेहात पकडण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले आहे.
दि.०७.०२.२०२३ रोजी रात्री ०२.३० वाजताचे सुमारास पो.स्टे.वाशिम शहरचे बीट मार्शल क्र.०१ चे अंमलदार प्रदीप बोडखे, ब.क्र.४१४ व संदीप वाकुडकर ब.क्र.३०३ हे रात्रगस्त करत असतांना सुभाष चौकातील सराफा लाईन येथील HDFC ATM मध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नातील चोरटे त्यांना दिसले. त्याठिकाणी चौकीदार असलेले प्रमोद उखळकर व पोलीस अंमलदार प्रदीप बोडखे व संदीप वाकुडकर यांनी समन्वयाने त्या ०२ आरोपींना रंगेहाथ पकडले. सदर आरोपी हे सुभाष चौकातील HDFC बँकेच्या ए.टी.एम.चा दरवाजा ओढून त्याचे लॉक तोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात होते. पोलीसांच्या प्रभावी पेट्रोलिंग व रात्र गस्त मुळे त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. सदर आरोपींविरुद्ध पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.६९/२३, कलम ३८०, ४५७, ५११, ३४ भादंवि नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
सदर कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली रफिक शेख, ठाणेदार, वाशिम शहर, सपोनि.ताठे, पोकॉ.प्रदीप बोडखे , संदीप वाकुडकर, सतीश बांगर यांनी पार पाडली. नागरिकांनी अश्या प्रकारचे गैरव्यवहार व संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
(जनसंपर्क अधिकारी)
पोलीस अधिक्षक, वाशिम करिता.
0 Comments