Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर येथे मूकनायक पत्रकार दिन साजरा

मंगरूळपीर : =
मंगरूळपीर येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . 
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी बोलताना सुधाकर चौधरी म्हणाले की डॉ बाबासाहेबांनी 31 जानेवारी 1920 रोजी "मुकनायक" वृत्तपत्र काढले होते. आज 31 जाने. 2023 रोजी एकशे तीन वर्षे झालीत. आज ची भ्रष्ठ पत्रकारिता पाहता  मनाला दुःख वाटते व खंत वाटते  की ,103 वर्षा पूर्वी एक महानायक लेखणी मधून लाखों मूक,वंचित,उपेक्षित समाजाचा
"मूकनायक"ठरला होता . त्या निर्भीड, निरपेक्ष पत्रकारास त्रिवार
अभिवादन! मानाचा मुजरा !
अलिकडच्या काळात पत्रकारांची पैदास झपाट्याने होत आहे. उठसुठ कोणीही पत्रकार होत आहे. गाडीवर प्रेस लिहायचे, गळ्यात कुठलेतरी ओळखपत्र अडकवायचे आणि शासकीय कार्यालयांत मिजास करत फिरणार्‍या पत्रकारांचे पेव फुटले आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्‍या अशा सडकछाप पत्रकारांनी उच्छाद मांडला आहे. कोणत्याही प्रकारची संवेदनशिलता नाही, सामाजिक प्रश्‍नांची जाण नसणार्‍या भुरट्या पत्रकारांनी मीडिया हे क्षेत्रच बदनाम केले आहे. असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातून वर्ल्ड स्पीड न्यूज वाशिम खबरचे संपादक सुधाकर चौधरी यांनी व्यक्त केले . तर प्रास्तावीक संदीप कांबळे यांनी केले . यावेळी विनोद डेरे , प्रा पी.आर तायडे, रणजीत भगत, रविभाऊ इंगळे मुदस्सिर सौदागर,  यांनी आपले मोलाचे विचार व्यक्त केले 
कार्यक्रमा चे अध्यक्ष सुधाकर चौधरी हे होते . तर प्रमुख अतिथी रवि इंगले .विनोद  डेरे मोहम्मद राशिद प्रा.पी.आर.तायडे  संदीप कांबळे  रणजित भगत .  मुदसीर सौदागर  राजेश सरदार  इंगळे, करण शेजव .डिगांबर कांबळे आनंदा राऊत आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन  व संचालन सा .विश्व कल्याण चे संपादक विनोद डेरे यांनी केले व आभार प्रदर्शन मुदस्सीर सौदागर यांनी केले .

Post a Comment

0 Comments