Ticker

6/recent/ticker-posts

दूध महागलं, पेट्रोल डिझेलनंतर आता एलपीजी सिलेंडरही महागले, चेक करा आजचे रेट


रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आता देशांतर्गत पातळीवर दिसून येत आहे. भारतात तेल खरेदी कंपन्यांनी मंगळवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या एलपीजी सिलिंडर  दरात वाढ केली.

दरात वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुध्दा वाढ होत आहे. भारतात पेट्रोल दरात  80 पैशांनी वाढ केली आहे. मागच्या आठवड्यात काही कंपन्यांनी दरात दोन ते पाच रूपयांनी वाढ केली होती. दोन वर्षात कोरोनाच्या काळात अर्थिक संकटात सापडलेला सामान्य नागरिक नुकताच उभारी घेत होता. एकाचवेळी सगळेचं दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनता यामध्ये होरपळली जाईल. विशेष म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून  पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात कोणत्या शहरात किती महागला सिलेंडर (आजचे दर)

पुणे – 952.5
नागपूर – 1,001.5
नाशिक – 953
औरंगाबाद – 958.5
मुंबई – 949.5

सिलेंडर महाग झालेल्या दराची  माहिती गोल्ड ईटर्न संकेतस्थळावरून घेतली आहे.

सिलिंडर 50 रुपयांनी महागला

आजपासून 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत. साधारण पाच महिन्याच्या कालावधीनंतर सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 949.5 रुपये झाली आहे. पूर्वी ते 899.50 रुपये होते.

कोणत्या शहरात किती महागला सिलेंडर

पंश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथे एलपीजी सिलेंडरची वाढलेली किंमत 976 रूपये झाली आहे. याच्या आगोदर कोलकत्ता शहरात सिलेंडरची किंमत 926 रूपये होती. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सिलेंडरची किंमत 938 रुपयांवरून 987.5 रुपयांपर्यंत वाढली आहे. पाटणामध्ये 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 998 रुपयांवरून 1039.5 रुपयांपर्यंत वाढली आहे.

मुंबई चन्नई किती महागला सिलेंडर

मुंबईत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरचा दर 899.5 रुपये होता, सध्याचा दर एलपीजी सिलेंडरचा दर 949.5 रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नईमध्ये 14.2 किलो एलपीजी सिलिंडरचा दर 915.5 रुपये होता. सध्याचा दर एलपीजी सिलिंडरचा दर 965.5 रुपये झाला आहे.

या कारणामुळे वाढले दर

4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तसेच 6 ऑक्टोबर 2021 पासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. तेल खरेदी कंपन्यांनी कच्च्या तेलाची ही महागाई ग्राहकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी इंधनाच्या दरात वाढ झाली.

Post a Comment

0 Comments